Sourav Ganguly ची माघार, वीरेंद्र सेहवाग कर्णधार; मुलींच्या शिक्षणासाठी India Maharajas vs World Giants सामन्यात दिग्गज भिडणार

Legends League Cricket Full Schedule : भारताच्या स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्ताने इडन गार्डनवर आज दिग्गजांची मांदियाळी पाहायला मिळणार आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 16, 2022 07:01 PM2022-09-16T19:01:45+5:302022-09-16T19:02:10+5:30

whatsapp join usJoin us
Legends League Cricket Full Schedule : Virender Sehwag lead India Maharajas against Team World Giants, in a charity match for Kapil Dev’s Khushii Foundation which supports girl child education | Sourav Ganguly ची माघार, वीरेंद्र सेहवाग कर्णधार; मुलींच्या शिक्षणासाठी India Maharajas vs World Giants सामन्यात दिग्गज भिडणार

Sourav Ganguly ची माघार, वीरेंद्र सेहवाग कर्णधार; मुलींच्या शिक्षणासाठी India Maharajas vs World Giants सामन्यात दिग्गज भिडणार

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

Legends League Cricket Full Schedule : भारताच्या स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्ताने इडन गार्डनवर आज दिग्गजांची मांदियाळी पाहायला मिळणार आहे.  लीजंड्स लीग क्रिकेटला आजपासून सुरुवात होणार आहे, परंतु कोलकाताच्या इडन गार्डवर इंडियन महाराजा विरुद्ध वर्ल्ड जायंट्स ( India Maharajas vs World Giants ) असा चॅरिटी सामना रंगणार आहे. इंडियन महाराजा संघाचे कर्णधारपद बीसीसीआय अध्यक्ष व माजी कर्णधार सौरव गांगुली ( Sourav Ganguly) भूषविणार होता, परंतु वैयक्तिक कारणास्तव त्याने माघार घेतली. या सामन्यासाठी गांगुली एकही पैसा घेणार नव्हता. पण, आता त्याच्या माघारीनंतर इंडियन महाराजाचे कर्णधारपद वीरेंद्र सेहवाग ( Virender Sehwag) याच्याकडे आले आहे. वर्ल्ड जायंट्स संघाचे कर्णधारपद दक्षिण आफ्रिकेचा दिग्गज जॅक कॅलिसकडे असणार आहे.

१९८३च्या वर्ल्ड कप विजेत्या संघाचे कर्णधार कपिल देव यांच्या खुशी फाऊंडेशन ( Khushii Foundation )ला या सामन्यातून उभा राहणारा निधी दिला जाणार आहे. ही संस्था मुलींच्या शिक्षणासाठी काम करते. या लीगमधील अम्पायर्स या सर्व महिला आहेत आणि भारतात असे प्रथमच घडणार आहे. या लीगचे पहिले पर्व वर्षाच्या सुरुवातीला मस्कत येथे पार पडले होते. या लीगमध्ये चार संघांचा समावेश आहे. वीरूसह गौतम गंभीर, हरभजन सिंग व परदेशी खेळाडूंचाही समावेश आहे. 

Legends League Cricket Full Schedule full schedule:

  • १६ सप्टेंबर, सायंकाळी ७.३० वा.पासून - इंडियन महाराजा वि. वर्ल्ड जायंट्स, कोलकाता
  • १७ सप्टेंबर, सायंकाळी ७.३० वा.पासून - इंडियन कॅपिटल्स वि. गुजरात जायंट्स, कोलकाता
  • १८ सप्टेंबर, सायंकाळी ७.३० वा.पासून - मनिपाल टायगर्स वि. भिलवारा किंग्स, लखनौ
  • १९ सप्टेंबर, सायंकाळी ७.३० वा.पासून - मनिपाल टायगर्स वि. गुजरात जायंट्स, लखनौ
  • २१ सप्टेंबर, सायंकाळी ७.३० वा.पासून - इंडियन कॅपिटल्स वि. भिलवारा किंग्स, लखनौ
  • २२ सप्टेंबर, सायंकाळी ७.३० वा.पासून - मनिपाल टायगर्स वि. गुजरात जायंट्स, दिल्ली
  • २४ सप्टेंबर, सायंकाळी ७.३० वा.पासून -  इंडियन कॅपिटल्स वि. भिलवारा किंग्स, दिल्ली
  • २५ सप्टेंबर, दुपारी ४ वा. पासून - इंडियन कॅपिटल्स वि. गुजरात जायंट्स, दिल्ली
  • २६ सप्टेंबर, सायंकाळी ७.३० वा.पासून - मनिपाल टायगर्स वि. भिलवारा किंग्स, कटक
  • २७ सप्टेंबर, सायंकाळी ७.३० वा.पासून - गुजरात जायंट्स वि. भिलवारा किंग्स, कटक
  • २९ सप्टेंबर, सायंकाळी ७.३० वा.पासून - इंडियन कॅपिटल्स वि. मनिपाल टायगर्स, कटक
  • ३० सप्टेंबर, सायंकाळी ७.३० वा.पासून - गुजरात जायंट्स वि. भिलवारा किंग्स, जोधपूर
  • १ ऑक्टोबर, सायंकाळी ७.३० वा.पासून - इंडियन कॅपिटल्स वि. मनिपाल टायगर्स, जोधपूर, 
  • २ ऑक्टोबर, दुपारी ४ वा. पासून - क्वालिफायर १, जोधपूर
  • ३ ऑक्टोबर, सायंकाळी ७.३० वा. पासून - एलिमिनेटर
  • ५ ऑक्टोबर, सायंकाळी ७.३० वा. पासून - अंतिम सामना  

संघ

  1. गुजरात जायंट्स - वीरेंद्र सेहवाग ( कर्णधार), ख्रिस गेल, पार्थिव पटेल, अजंथा मेंडिस, मनविंदर बिस्ला, लेंडल सिमन्स, रिचर्ड लेवी, मिचेल मॅकलेघन, स्टुअर्ट बिन्नी, केव्हिन ओब्रायन, अशोक दिंडा, जोगिंदर शर्मा, ग्रॅमी स्मिथ, ख्रिश ट्रेम्लेट, एल्टन चिगुमबुरा
  2. मनिपाल टायगर्स - हरभजन सिंग ( कर्णधार), परिवंदर अवाना, व्हीआरव्ही सिंग, इम्रान ताहीर, ब्रेट ली, मुथय्या मुरलीधरन, फिल मस्टर्ड, मोहम्मद कैफ, रायन साईडबॉटम, लान्स क्लुझनर, दिमित्री मास्कारेन्हास, रोमेश कालुवितरणा, रितिंदर सोढी, कोरी अँडरसन, डॅरेन सॅमी  
  3. इंडियन कॅपिटल्स - गौतम गंभीर ( कर्णधार), लिएम प्लंकेट, रजत भाटीया, हॅमिल्टन मसाकाड्झा, मश्रफे मोर्ताझा, जॉन मूनी, रवी बोपारा, प्रविण तांबे, दिनेश रामदिन, असघर अफघान, मिचेल जॉन्सन, प्रॉस्पर उत्सेया, रॉस टेलर, जॅक कॅलिस, पंकज सिंग 
  4. भिलवारा किंग्स - इरफान पठाण ( कर्णधार), युसूफ पठाण, निक कॉम्प्टन, श्रीसंथ, शेन वॉटसन, टीम ब्रेस्नान, ओवैस शाह, माँटी पानेसर, नमन ओझा, विलियम पोर्टरफिल्ड, फिडेल एडवर्ड्स, समीत पटेल, मॅट प्रायर, टीनो बेस्ट, सुदीप त्यागी 

Web Title: Legends League Cricket Full Schedule : Virender Sehwag lead India Maharajas against Team World Giants, in a charity match for Kapil Dev’s Khushii Foundation which supports girl child education

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.