Join us  

चौथ्या कसोटीपूर्वीच लेहमन ऑस्ट्रेलियाचे प्रशिक्षकपद सोडण्याच्या तयारीत

क्रिकेट ऑस्ट्रेलियाने अजून त्यांच्यावर कोणतीही कारवाई केलेली नाही. पण ही कारवाई होण्यापूर्वीच लेहमन आपले पद चौथ्या कसोटी सामन्यापूर्वीच सोडण्याच्या तयारीत आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 27, 2018 4:43 PM

Open in App
ठळक मुद्दे2019 साली होणाऱ्या अॅशेस मालिकेनंतर आपण प्रशिक्षकपद सोडणार, असे लेहमन यांनी एका मुलाखतीमध्ये म्हटले होते. पण दक्षिण आफ्रिकेत घडलेल्या चेंडूच्या छेडछाडीमुळे लेहमन हे व्यथित झाले आहेत. त्यामुळेच त्यांनी आपण चौथ्या कसोटी सामन्यापूर्वीच हे पद सोडणार असल्याचे

केप टाऊन : क्रिकेटला काळीमा फासणारे कृत्य केल्यानंतर ऑस्ट्रेलियाचे प्रशिक्षक डॅरेन लेहमन हे आपल्या पदाचा राजीनामा देण्याच्या तयारी आहेत. क्रिकेट ऑस्ट्रेलियाने अजून त्यांच्यावर कोणतीही कारवाई केलेली नाही. पण ही कारवाई होण्यापूर्वीच लेहमन आपले पद चौथ्या कसोटी सामन्यापूर्वीच सोडण्याच्या तयारीत आहेत.

 

काय आहे प्रकरणकेप टाऊन येथील दक्षिण आफ्रिकेविरूद्धच्या तिस-या कसोटी सामन्यादरम्यान ऑस्ट्रेलियाचा कॅमेरून बेनक्रॉफ्ट हा क्षेत्ररक्षक चेंडू एका पिवळसर वस्तूवर घासत असल्याचे चित्रिकरणात स्पष्ट दिसलं. पंच जवळ येत असतानाच बेनक्राफ्ट याने आपल्या अंतवस्त्रात एक छोटी पिवळी वस्तु लपवली. जेव्हा पंचांनी त्याला विचारले. तेव्हा पँटमध्ये हात टाकून त्याने ती वस्तु दाखवली. चष्मा साफ करण्याच्या मऊ कपड्यासारखी ती होती. बेनक्राफ्ट याने पत्रकार परिषदेत मान्य केले की तो टेपने चेंडूचा आकार बदलण्याचा प्रयत्न करत होता. यानंतर कर्णधार स्टीव्हन स्मिथ आणि उपकर्णधार डेव्हिड वॉर्नर यांना आपले पद गमवावे लागले होते.

 

लेहमन यांनी आतापर्यंत बऱ्याच मोठ्या स्पर्धांमध्ये ऑस्ट्रेलियाला जेतेपद मिळवून दिले आहे. खेळाडूंसाठी मित्र, फिलॉसॉफर आणि गाईड, अशी लेहमन यांची ओळख होती. ऑस्ट्रेलियाने जेव्हा 2015 साली विश्वचषक जिंकला तेव्हा लेहमन हेच संघाचे प्रशिक्षक होते. यावेळी लेहमन यांनी खेळाडूंकडून तंत्र चांगलेच घोटवून घेतले होते. जेतेपद पटकावल्यावर ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंनी लेहमन यांना चक्क बीअरने आंघोळ घातली होती.

सारे काही आलबेल सुरु होते. त्यामुळे 2019 साली होणाऱ्या अॅशेस मालिकेनंतर आपण प्रशिक्षकपद सोडणार, असे लेहमन यांनी एका मुलाखतीमध्ये म्हटले होते. पण दक्षिण आफ्रिकेत घडलेल्या चेंडूच्या छेडछाडीमुळे लेहमन हे व्यथित झाले आहेत. त्यामुळेच त्यांनी आपण चौथ्या कसोटी सामन्यापूर्वीच हे पद सोडणार असल्याचे खासगीत म्हटले आहे. याबाबतचे वृत्त इंग्लंडमधील 'डेली टेलिग्राफ'ने दिले आहे. त्यामुळे जर लेहमन यांनी तातडीने राजीनामा दिला तर चौथ्या सामन्यात ऑस्ट्रेलियाचे प्रशिक्षकपद कोण भूषवणार, हा सर्वात मोठा प्रश्न असेल.

टॅग्स :चेंडूशी छेडछाडडेव्हिड वॉर्नरद. आफ्रिकाआॅस्ट्रेलिया