Shubman Gill, LEI vs IND : भारतीय संघ इंग्लंड दौऱ्यावर रवाना होण्यापूर्वी सलामीवीर लोकेश राहुलला ( KL Rahul) दुखापतीतून न सावरल्यामुळे मालिकेतून माघार घ्यावी लागली. त्यानंतर फिरकीपटू आर अश्विनचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. तो बरा होऊन लंडनमध्ये दाखल झाला अन् रोहित शर्माचा ( Rohit Sharma) रिपोर्टही पॉझिटिव्ह आला. आता १ जुलैपासून सुरू होणाऱ्या पाचव्या कसोटीत रोहितच्या समावेशाबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. त्यात KL Rahul ला रिप्लेसमेंट म्हणून मयांक अग्रवालला ( Mayank Agarwal) लंडनमध्ये नेण्यास संघ व्यवस्थापनाने नकार दिला. त्यात आता आणखी एक धक्का देणारे चित्र समोर दिसतेय.
लिसेस्टरशायर क्लबविरुद्धच्या या सामन्यात भारताच्या आघाडीच्या फलंदाजांना पहिल्या डावात अपयश आले, परंतु दुसऱ्या डावात त्यांनी चांगले कमबॅक केले. श्रीकर भरत ( KS Bharat) यांनी दोन्ही डावांत दमदार खेळ केला, तर विराट कोहली व रवींद्र जडेजा यांनी दुसऱ्या डावात अर्धशतकी खेळी करून भारताला ९ बाद ३६४ धावा उभारून दिल्या. भारताने ३६६ धावांची आघाडी घेतली आहे. रोहित शर्माला कोरोनाची लागण झाल्यामुळे दुसऱ्या डावात केएस भरत व शुबमन गिल सलामीला आले आणि त्यांनी ६२ धावांची भागीदारी केली. भरतने ४३, तर गिलने ३८ धावा केल्या. त्यानंतर हनुमा विहारी व श्रेयस अय्यर हे अनुक्रमे २० व ३० धावांवर माघारी परतले. पहिल्या डावात ७० धावा करणाऱ्या भरतमुळेच भारताने २४६ धावांपर्यंत मजल मारली. कोहलीने पहिल्या डावात ३३, तर दुसऱ्या डावात ६७ धावा केल्या.
याच सामन्यात मोहम्मद सिराजच्या गोलंदाजीवर सलामीवीर शुबमन गिल याच्या हाताला दुखापत झाली. लोकेश व रोहित यांच्यानंतर गिलही कसोटीला मुकला तर सलामीला कोण येणार, हा मोठा प्रश्न उद्भवू शकतो. गिलला प्रचंड वेदना होताना दिसल्या...
टीम इंडियाकडे पर्याय काय? केएस भरत आणि विराट कोहली ही जोडी सलामीला येऊ शकते.. त्यानंतर हनुमा विहारी, श्रेयस अय्यर, चेतेश्वर पुजारा, रिषभ पंत, रवींद्र जडेजा, आर अश्विन, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, उमेश यादव/शार्दूल ठाकूर असा संघ असू शकतो.