LEI vs IND : चार दिवसीय सराव सामन्यात प्रथम फलंदाजी करणाऱ्या भारतीय संघाची अवस्था पहिल्या दिवशी ८ बाद २४६ अशी झाली. केएस भरतने नाबाद ७० धावा करताना लिसेस्टरशायरच्या गोलंदाजांना आव्हान दिले. विराट कोहलीही चांगल्या फॉर्मात दिसला, परंतु ३३ धावांवर तो LBW झाला. मात्र, त्याआधीच तो बाद झाला होता आणि तरीही तो खेळपट्टीवर फलंदाजी करत राहिला. अॅबिडीने सकांडेने टाकलेल्या चेंडूवर ड्राईव्ह मारण्याचा प्रयत्न फसला अन् चेंडू बॅटची किनार घेत स्लिममध्ये उभ्या असलेल्या खेळाडूच्या हाती गेला. जोरदार अपील झाले अन् खेळाडूंनी सेलिब्रेशन सुरू केले, परंतु विराट जागच्या जागी उभाच राहिला. चेंडू क्षेत्ररक्षकाच्या हाती विसावण्यापूर्वी टप्पा खालल्याचा दावा विराटने केला. पण, प्रत्यक्षात व्हिडीओ स्लो मोशनमध्ये पाहिल्यास विराट बाद असल्याचे स्पष्ट दिसतेय...
शुबमन गिल ( २१), रोहित शर्मा ( २५), श्रेयस अय्यर ( ०), रवींद्र जडेजा ( १३) व विराट कोहली ( ३३) हे माघारी परतल्यानंतर केएस भरत व उमेश यादव यांनी झटपट ६६ धावांची भागीदारी करताना भारताला दोनशेपार नेले. भरतने जबाबदारीने खेळ करताना ९३ चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले. त्याला उमेशने २३ धावा करून चांगली साथ दिली. मोहम्मद शमीही सुसाट फटकेबाजी करताना दिसला. भरनेही अर्धशतकानंतर आक्रमक खेळ करण्यास सुरुवात केली. दिवसाचा खेळ संपला तेव्हा भारताच्या ८ बाद २४६ धावा झाल्या होत्या. शमी १८ धावांवर नाबाद होता, तर भरतने १११ चेंडूंत ८ चौकार व १ षटकारासह नाबाद ७० धावा केल्या होत्या.
भारताच्या ८ बाद २४६ धावांच्या प्रत्युत्तरात मैदानावर उतरलेल्या लिसेस्टरशायरला शमीने २२ धावांवर दोन धक्के दिले. कर्णधार सॅम इव्हान्स ( १) याला सातव्या षटकांत बाद केले. त्यानंतर ९व्या षटकात शमीने भारताच्याच पण, सराव सामन्यात लिसेस्टरशायरकडून खेळणाऱ्या चेतेश्वर पुजाराचा ( Cheteshwar Pujara) त्रिफळा उडवला. यानंतर पेव्हेलियनमध्ये जाणाऱ्या चेतेश्वरकडे शमी धावला अन् त्याला मिठी मारून सेलिब्रेशन केले. त्यानंतर मोहम्मद सिराजने दोन धक्के देताना लिसेस्टरशायरची अवस्था ४ बाद ८० अशी केली आहे.
Web Title: LEI vs IND : Out or not out?, Virat Kohli appeared to have gotten away with a thick slice to second slip in India's tour match against a Leicestershire XI, Video
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.