LEI vs IND : सराव सामन्यात रिषभ पंतला ( Rishabh Pant) सूर गवसला. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या ट्वेंटी-२० मालिकेत रिषभला फार चांगली कामगिरी करता आली नव्हती. त्यामुळे इंग्लंड दौऱ्यावर त्याचा खेळ कसा होतोय याकडे सर्वांचे लक्ष होते. भारत-इंग्लंड यांच्यात १ जुलैपासून कसोटीला सुरुवात होतेय, परंतु त्याआधी भारतीय संघ चार दिवसीय सराव सामना खेळतोय. रिषभने आज दमदार खेळ केला खरा, परंतु त्याने भारतीय गोलंदाजांचीच धुलाई केली. लिसेस्टरशायर क्लबचे प्रतिनिधित्व करणाऱ्या रिषभने सहाव्या व सातव्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी करताना भारतीय गोलंदाजांच्या मर्यादा स्पष्ट केल्या
प्रत्युत्तरात मैदानावर उतरलेल्या लिसेस्टरशायरला शमीने २२ धावांवर दोन धक्के दिले. कर्णधार सॅम इव्हान्स ( १) याला सातव्या षटकांत बाद केले. त्यानंतर ९व्या षटकात शमीने लिसेस्टरशायरकडून खेळणाऱ्या चेतेश्वर पुजाराचा ( Cheteshwar Pujara) त्रिफळा उडवला. त्यानंतर मोहम्मद सिराजने दोन धक्के देताना लिसेस्टरशायरची अवस्था ४ बाद ८० अशी केली आहे. रिषभ पंत व रिषी पटेल यांनी पाचव्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी करताना डाव सावरला. शमीने ही जोडी तोडली अन् पटेल ३४ धावांवर माघारी परतला. शार्दूल ठाकूरने लिसेस्टरच्या सॅम बॅट्सला ( ८) बाद केले.रिषभने ७३ चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले. त्याने ५३ धावांच्या खेळीत ९ चौकार व १ षटकार खेचले.