Virat Kohli, LEIvIND : 'कच्चा लिंबू' गोलंजासमोर विराट कोहली, रोहित शर्मा फेल; अम्पायरने बाद देताच Kohli विचारत बसला जाब, Video 

India Tour of England : जेम्स अँडरसन, स्टुअर्ट ब्रॉड, बेन स्टोक्स आदी मात्तबर गोलंदाजांचा सामना करण्याआधी भारतीय संघ सराव सामन्यात दम दाखवणे अपेक्षित होते.

By ऑनलाइन लोकमत | Published: June 23, 2022 07:50 PM2022-06-23T19:50:18+5:302022-06-23T19:51:12+5:30

whatsapp join usJoin us
LEIvIND : 21-year-old Roman Walker 8.1-4-13-5; hasn't played a single first-class match has got the wicket of Virat Kohli and Rohit Sharma in the warm up match, Video   | Virat Kohli, LEIvIND : 'कच्चा लिंबू' गोलंजासमोर विराट कोहली, रोहित शर्मा फेल; अम्पायरने बाद देताच Kohli विचारत बसला जाब, Video 

Virat Kohli, LEIvIND : 'कच्चा लिंबू' गोलंजासमोर विराट कोहली, रोहित शर्मा फेल; अम्पायरने बाद देताच Kohli विचारत बसला जाब, Video 

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

India Tour of England : जेम्स अँडरसन, स्टुअर्ट ब्रॉड, बेन स्टोक्स आदी मात्तबर गोलंदाजांचा सामना करण्याआधी भारतीय संघ सराव सामन्यात दम दाखवणे अपेक्षित होते. पण, लिसेस्टरशायर क्लबमधील 'कच्चा लिंबू' गोलंदाजाने भारताच्या स्टार्सना आसमान दाखवले. २१ वर्षीय रोमन वॉकर ( Roman Walker) याच्याकडे एकही प्रथम श्रेणी क्रिकेटचा अनुभव नाही, तरीही त्याने भारताचा निम्मा संघ तंबूत पाठवला. यात रोहित शर्मा, विराट कोहली ( Virat Kohli), हनुमा विहारी, रवींद्र जडेजा या मुरब्बी खेळाडूंचा समावेश आहे. 


कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. १०व्या षटकात गिल ( २१) व शर्मा यांची ३५ धावांची भागीदारी संपुष्टात आली. पुल शॉट मारण्याच्या प्रयत्नात रोहित शर्मा २५ धावांवर बाद झाला, तर हनुमा विहारीनेही ३ धावांवर विकेट टाकली. प्रसिद्ध कृष्णाने श्रेयस अय्यरला भोपळ्यावर माघारी पाठवले. रवींद्र जडेजा व विराट कोहली यांनी डाव सावरण्याचा प्रयत्न केला. दोघांनी पाचव्या व विकेटसाठी २६ धावांची भागीदारी केली. वॉकरने ही जोडी तोडताना जडेजाला १३ धावांवर LBW केले. भारताचा निम्मा संघ ८१ धावांवर माघारी परतला. 

भारतीय संघाच्या मदतीला विराट कोहली ( Virat Kohli) व केएस भरत धावून आले. या दोघांनी सहाव्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी केली. या दोघांनी ५७ धावांची भागीदारी केली. रोमन वॉकरने ४१व्या षटकात विराटला LBW केले. विराट चांगल्या फॉर्मात दिसत होता, त्याने जसप्रीत बुमराहच्या गोलंदाजीवर काही सुरेख ड्राईव्हही मारले. पण, ६९ चेंडूंत ४ चौकार व १ षटकारासह ३३ धावांवर त्याची खेळी संपुष्टात आली. शार्दूल ठाकूरचाही त्रिफळा उडवून वॉकरने पाच विकेट्स घेतल्या. त्याने  १० षटकांत २१ धावा देत ५ विकेट्स घेतल्या. यात त्याने ५ षटकं निर्धाव फेकली. भारताची अवस्था ७ बाद १४८ अशी झाली आहे. 


Web Title: LEIvIND : 21-year-old Roman Walker 8.1-4-13-5; hasn't played a single first-class match has got the wicket of Virat Kohli and Rohit Sharma in the warm up match, Video  

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.