LEIvIND : भरत आला धावून!, KS Bharatमुळे टीम इंडियाची पहिल्याच दिवशी All Out होण्याची नामुष्की टळली, Video 

लिसेस्टरशायर क्लबमधील २१ वर्षीय रोमन वॉकर ( Roman Walker) या प्रथम श्रेणी क्रिकेटचा अनुभव नसलेल्या गोलंदाजाने भारताचा निम्मा संघ २४ धावांत माघारी पाठवला.

By ऑनलाइन लोकमत | Published: June 23, 2022 09:32 PM2022-06-23T21:32:58+5:302022-06-23T21:33:39+5:30

whatsapp join usJoin us
LEIvIND : 21-year-old Roman Walker take 5 wickets, but team india KS Bharat score 70* from 111 balls, stumped day 1 india 8/246, Video   | LEIvIND : भरत आला धावून!, KS Bharatमुळे टीम इंडियाची पहिल्याच दिवशी All Out होण्याची नामुष्की टळली, Video 

LEIvIND : भरत आला धावून!, KS Bharatमुळे टीम इंडियाची पहिल्याच दिवशी All Out होण्याची नामुष्की टळली, Video 

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

India Tour of England : जेम्स अँडरसन, स्टुअर्ट ब्रॉड, बेन स्टोक्स आदी मात्तबर गोलंदाजांचा सामना करण्याआधी भारतीय संघ सराव सामन्यात दम दाखवणे अपेक्षित होते. पण, लिसेस्टरशायर क्लबमधील २१ वर्षीय रोमन वॉकर ( Roman Walker) या प्रथम श्रेणी क्रिकेटचा अनुभव नसलेल्या गोलंदाजाने भारताचा निम्मा संघ २४ धावांत माघारी पाठवला. केएस भरत ( KS Bharat) याने टीम इंडियाला सावरले... त्याच्या नाबाद अर्धशतकाच्या जोरावर भारताने पहिल्या दिवशी ऑल आऊट होण्याची नामुष्की टाळली. 
 


कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. १०व्या षटकात गिल ( २१) व शर्मा ( २५) यांची ३५ धावांची भागीदारी संपुष्टात आली. श्रेयस अय्यर भोपळ्यावर माघारी परतला. रवींद्र जडेजा ( १३) व विराट कोहली यांनी डाव सावरण्याचा प्रयत्न केला. दोघांनी पाचव्या व विकेटसाठी २६ धावांची भागीदारी केली.  भारताचा निम्मा संघ ८१ धावांवर माघारी परतला. विराट ( Virat Kohli) व केएस भरत धावून आले. या दोघांनी सहाव्या विकेटसाठी ५७ धावांची भागीदारी केली. रोमन वॉकरने ४१व्या षटकात विराटला LBW केले. ६९ चेंडूंत ४ चौकार व १ षटकारासह ३३ धावांवर त्याची खेळी संपुष्टात आली. शार्दूल ठाकूरचाही त्रिफळा उडवून वॉकरने पाच विकेट्स घेतल्या. 

केएस भरत व उमेश यादव यांनी झटपट ६६ धावांची भागीदारी करताना भारताला दोनशेपार नेले. भरतने जबाबदारीने खेळ करताना ९३ चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले. त्याला उमेशने २३ धावा करून चांगली साथ दिली. मोहम्मद शमीही सुसाट फटकेबाजी करताना दिसला. भरनेही अर्धशतकानंतर आक्रमक खेळ करण्यास सुरुवात केली. दिवसाचा खेळ संपला तेव्हा भारताच्या ८ बाद २४६ धावा झाल्या होत्या. शमी १८ धावांवर नाबाद आहे, तर भरतने १११ चेंडूंत ८ चौकार व १ षटकारासह नाबाद ७० धावा केल्या आहेत. 

Web Title: LEIvIND : 21-year-old Roman Walker take 5 wickets, but team india KS Bharat score 70* from 111 balls, stumped day 1 india 8/246, Video  

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.