जगभरातील कोरोना रुग्णाची संख्या 25 लाख, 57,504 झाली आहे. त्यापैकी 1 लाख 77,662 जणांचा मृत्यू झाला आहे, तर 6 लाख 90,681 जणं बरी झाली आहेत. कोरोना व्हायरसचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी जगभरात अनेक देशांनी लॉकडाऊन केले आहे. त्यात पाकिस्तानचाही समावेश आहे. या लॉकडाऊनमुळे देशाची आर्थिक घडीही विस्कटली आहे. त्यामुळे आधीच कर्जबाजारी असलेला पाकिस्तान कर्जाच्या ओझ्याखाली दबला गेला आहे. देशाला या संकटातून सावरण्यासाठी पंतप्रधान इम्रान खान यांना मदत करा असं आवाहन पाकिस्तानचा माजी गोलंदाज वकार युनीसनं केलं आहे.
पाकिस्तानचा माजी कर्णधार आणि माजी प्रशिक्षक वकारनं बुधवारी सोशल मीडियावर एक व्हिडीओ पोस्ट केला. त्यात त्यानं म्हटलं की,''आमचा देश सध्या संकटात आहे. कोरोना व्हायरसनंतर देशाच्या आर्थिक घडीला मोठा धक्का बसू शकतो. जगभरातील अर्थव्यवस्था डळमळीत झाली आहे. पाकिस्तान सोबतही तसंच झालं आहे. आमचा देश आधीच कर्जबाजारी आहे, हेही तुम्हाला माहित असेल.''
वकारनं यावेळी लोकांना पाकिस्तानला मदत करण्याचं आवाहन केलं. तो म्हणाला,''पंतप्रधान इम्रान खान यांनी कोरोना व्हायरस फंडात मदत करण्याचं आवाहन केलं आहे. त्यांना मदत करणे, हे आपले सर्वांचे कर्तव्य आहे. आपला देश आपल्याला पुन्हा सुजलाम-सुफलाम करायचा आहे. पाकिस्तानी जनतेसह परदेशातील लोकांनीही आम्हाला पायावर उभं राहण्यासाठी मदत करावी.''
अन्य महत्त्वाच्या बातम्या
स्टार खेळाडूच्या पत्नीनं कोरोनाबाबत चुकीची माहिती केली पोस्ट, अन्...
संघात निवड झाली नाही, म्हणून रात्रभर रडला होता Virat Kohli!
गांगुली, धोनी, विराट नाही, तर गंभीर म्हणतो 'हा' खेळाडू भारताचा सर्वोत्तम कर्णधार
गोल्फपटू अर्जुन भाटीनं ठेवला आदर्श; ट्रॉफीनंतर आता 'खास' वस्तू विकून उभारला निधी
लॉकडाऊनंतर MS Dhoni मैदानावर उतरणार, क्रिकेट संघटनेकडे ठेवला प्रस्ताव
MS Dhoniचं बॉलिवूडच्या अभिनेत्रीवर होतं प्रेम, पण Yuvraj Singh साठी केला त्याग?
Video : 'Desert Storm' नंतर जेव्हा Sachin Tendulkar बॅट तळपली होती...