मुंबई : सीएसकेच्या आक्रमकतेला तोडीस तोड उत्तर दिलेल्या लखनऊ सुपरजायंट्सने २११ धावांचे लक्ष्य अखेरच्या षटकात ३ चेंडू आणि ६ गडी राखून पार केले. चेन्नई सुपरकिंग्जने २० षटकांत ४ बाद २१० धावा उभारल्यानंतर लखनऊ सुपरजायंट्सने १९.३ षटकांत ४ बाद २११ धावा केल्या. लखनऊने पहिला विजय मिळवला, तर सीएसकेचा सलग दुसरा पराभव झाला. दोन सुपर संघांमध्ये झालेल्या या लढतीत लखनऊ 'सुपर' ठरले.
भल्यामोठ्या लक्ष्याचा पाठलाग करताना कर्णधार लोकेश राहुल आणि क्विंटन डीकॉक यांनी ९९ धावांची सलामी देत लखनऊला जबरदस्त सुरुवात करुन दिली. डीकॉकने वेगवान अर्धशतकासह संघाच्या विजयाचा पाया भक्कम केला. यानंतर सर्व सूत्रे सांभाळली ती एविन लुईसने. त्याने अखेरपर्यंत टिकून राहताना २३ चेंडूंत नाबाद ५३ धावांचा विजयी तडाखा दिला. त्याआधी, रॉबिन उथप्पा आणि अष्टपैलू शिवम दुबे यांच्या जोरावर सीएसकेने धावांचा डोंगर उभारला. उथप्पाने अर्धशतक झळकावले, तर दुबेचे अर्धशतक केवळ एका धावेने हुकले. सीएसकेने पॉवर प्लेमध्ये ६९ धावा चोपल्या. मोइन अली, अंबाती रायुडू यांनीही दमदार फटकेबाजी केली. लखनऊला गचाळ क्षेत्ररक्षणाचाही फटका बसला.
ब्रावोचा विक्रमी बळी : ड्वेन ब्रावोने १८व्या षटकात दीपक हूडाला झेलबाद केले आणि यासह तो आयपीएलमध्ये सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज ठरला. त्याने मुंबई इंडियन्सच्या लसिथ मलिंगाचा १७० बळींचा विक्रम मोडताना आयपीएलमध्ये १७१ वा बळी मिळवला.
धोनीच्या ७ हजार धावा
सामन्यात महेंद्रसिंग धोनी याने सहा चेंडूंवर १६ धावा केल्या. त्याने १५ वी धाव काढताच टी-२० प्रकारात सात हजार धावांचा टप्पा देखील गाठला. सात हजार धावांचा पल्ला गाठणारा भारताचा तो सहावा खेळाडू ठरला.
n ड्वेन ब्रावोच्या गोलंदाजीवर अलीने डीकॉकचा झेल सोडला. डीकॉक तेव्हा ३० धावांवर होता.
n सीएसकेने पत्त्यांच्या खेळाप्रमाणे तुरुपचा एक्का म्हणून शिवम दुबेला १९ वे षटक दिले. मात्र, या षटकात आयुष बदोनी आणि लुईस यांनी २५ धावांचा निर्णायक तडाखा देत सामना फिरवला.
खेळाडू
उथप्पा पायचित गो. बिश्नोई ५० २७ ८/१ १८५
ऋतुराज धावबाद ०१ ०४ ०/० २५
मोईन अली त्रि. गो. आवेश ३५ २२ ४/२ १५९
शिवम दुबे झे. लेवीस गो. खान ४९ ३० ५/२ १६३
अंबाती रायुडू त्रि. गो. बिष्णोई २७ २० २/२ १३५
रविंद्र जडेजा झे. पांडे गो. टाय १७ ०९ ३/० १८८
एम. एस. धोनी नाबाद १६ ०६ २/१ २६६
प्रीटोरीयस पायचित गो. टाय ०० ०१ ०/० ००
ड्वेन ब्राव्हो नाबाद ०१ ०१ ०/० १००
Web Title: Lewis wins 'Super' victory, Lucknow wins IPL victory
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.