भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली ( Virat Kohli) क्रिकेट सोडून वेगळ्या मुद्यामुळे आता चर्चेत आला आहे. विराट कोहलीची One8.commune ही रेस्टॉरंटची चैन पुणे, कोलकाता व दिल्ली येथे आहे. विराटच्या रेस्टॉरंटमध्ये LGBTQIA+ लोकांना प्रवेश नाकारण्यात येत असल्याचा आरोप या समुहानं केला आहे. विराटच्या रेस्टॉरंटमध्ये फक्त विषमलिंगी जोडप्यांना प्रवेश दिला जात असल्याची तक्रार या समुहानं विराटडे केली आहे. सोशल मीडियावर एक पोस्ट व्हायरल होत आहे आणि त्यात असे म्हटले आहे की,''विराट कोहलीच्या One8.commune रेस्टॉरंटची चैन पुणे, दिल्ली आणि कोलकाता येथे आहेत. Zomato listingमध्ये हे रेस्टॉरंट आहे आणि तेथे गे लोकांना परवानगी नसल्याचे नमुद केलं गेलं आहे. दोन आठवड्यापूर्वी याबाबत आम्ही विराटकडे तक्रार केली आहे, परंतु अद्याप कोणतंही उत्तर आलेलं नाही. आम्ही पुणे शाखेला फोन करून विचारलं आणि त्यांनी आम्हाला विषमलिंगी जोडपे किंवा मुलींचा गट यांनाच प्रवेश असल्याचे सांगितले. गे जोडपे किंवा मुलांच्या गटाला परवानगी नाही. ट्रान्स महिलांना परवानगी आहे, परंतु त्यांच्या पेहराव्यावरून तो प्रवेश दिला जाईल.'' सोशल मीडियावर सध्या ही पोस्ट व्हायरल होत आहे.
- Cricket Buzz»
- बातम्या»
- Virat Kohli vs LGBTQIA+ Group : विराट कोहलीला LGBTQIA+गटानं विचारला जाब; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
Virat Kohli vs LGBTQIA+ Group : विराट कोहलीला LGBTQIA+गटानं विचारला जाब; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली क्रिकेट सोडून वेगळ्या मुद्यामुळे आता चर्चेत आला आहे.
By ऑनलाइन लोकमत | Published: November 15, 2021 3:43 PM