गतवर्षी इंग्लंड संघाने वन डे वर्ल्ड कप नावावर केला. 2019मध्ये घरच्या मैदानावर झालेल्या स्पर्धेत इंग्लंडला अंतिम सामन्यात न्यूझीलंड संघानं कडवी टक्कर दिली. पण, जास्त चौकाराच्या नियमानुसार इंग्लंडला विजयी घोषित करण्यात आलं. इंग्लंडनं पहिल्यांदा वन डे वर्ल्ड कप जिंकण्याचा पराक्रम केला. पण, आता याच विजेत्या संघातील एका खेळाडूनं थेट इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट मंडळाला इशारा दिला आहे. त्यानं थेट इंग्लंड सोडून अमेरिका क्रिकेट संघाकडून खेळण्याची तयारी दर्शवली आहे.
कोरोना व्हायरसच्या संकटातून सावरताना इंग्लंड क्रिकेटपटूंनी सरावाला सुरुवात केली. पुढील महिन्यात वेस्ट इंडिजविरुद्ध ते घरच्या मैदानावर कसोटी मालिका खेळणार आहेत. त्यासाठी निवडलेल्या खेळाडूंतून गोलंदाज लायन प्लंकेटला वगळण्यात आले. त्यामुळे प्लंकेट नाराज झाला. त्यानं बीसीसी रेडिओशी बोलताना सांगितले की, अजून माझ्यात बरेच क्रिकेट शिल्लक आहे. इंग्लंड संघ मला संधी देत नसेल तर मी अमेरिका संघासाठी इंटरनॅशनल क्रिकेट खेळण्याचा विचार करेन.
प्लंकेटची पत्नी एमेलिया एर्ब अमेरिकन नागरिक आहे. कुटुंबीयांसोबत अमेरिकेत स्थायिक व्हायचे आहे, असे प्लंकेटनं सांगितले. त्याची मुलंही अमेरिकन नागरिक होतील. अमेरिकेतील क्रिकेटला प्रोत्साहन देण्याचं काम करायला आवडेल, असेही प्लंकेट म्हणाला.
प्लंकेटला तीन वर्षांसाठी अमेरिकेत रहावे लागेल आणि त्यानंतर त्याला संघातून खेळता येईल. दक्षिण आफ्रिकेचा फिरकीपटू डॅनिएल पीट हाही अमेरिकेत स्थायिक झाला आहे. प्लंकेटनं इंग्लंडसाठी 13 कसोटीत 41 विकेट्स घेतल्या आहेत. वन डे आणि ट्वेंटी-20 त अनुक्रमे त्यानं 135 व 25 विकेट्स घेतल्या आहेत. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये त्याच्या नावावर 453 विकेट्स आहेत.
निर्दयी मनुष्य; गर्भवती हत्तीची निर्घृण हत्या; भुकेनं व्याकुळ भटकत होती
17 वर्षीय नसीम शाह टीम इंडियाच्या विराट कोहलीला सहज बाद करेल; पाकिस्तानी क्रिकेटपटूचा दावा
वाईट बातमी: नऊ वेळा विश्वविजेतेपद पटकावणाऱ्या खेळाडूनं घेतला अखेरचा श्वास
'त्या' प्रसंगामुळे प्रचंड वेदना झाल्या होत्या; हार्दिक पांड्यानं व्यक्त केली खंत
'अलग प्रकार का आदमी है!' हार्दिक-नताशाच्या पहिल्या भेटीचा भन्नाट किस्सा