Join us  

Mumbai Power Cut : मुंबईची बत्ती गुल झाली अन् जोफ्रा आर्चरचं ७ वर्षांपूर्वीच्या ट्विटची चर्चा रंगली!

मुंबई : मुंबईमध्ये आज सकाळी सव्वा दहाच्या सुमारास अनेक ठिकाणी वीजपुरवठा खंडित झाला. पॉवर ग्रीड फेल्युअरमुळे एकाचवेळी मुंबईतील अनेक ठिकाणी वीजपुरवठा खंडित झाला.

By स्वदेश घाणेकर | Published: October 12, 2020 5:31 PM

Open in App

मुंबई : मुंबईमध्ये आज सकाळी सव्वा दहाच्या सुमारास अनेक ठिकाणी वीजपुरवठा खंडित झाला. पॉवर ग्रीड फेल्युअरमुळे एकाचवेळी मुंबईतील अनेक ठिकाणी वीजपुरवठा खंडित झाला. मात्र, आता टप्प्या टप्प्यानं वीजपुरवठा सुरू होत आहे. आठवड्याच्या पहिल्याच दिवशी मुंबई आणि आसपासच्या शहरांमधील बत्ती एकाएकी गुल झाल्याने एकच गोंधळ उडाला आहे. मुंबई, ठाणे, नवी मुंबई, कल्याण-डोंबिवलीतील वीज पुरवठा खंडित झाल्यानं ऑनलाईन शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. पण, मुंबईची बत्ती गुल झाल्यानंतर इंग्लंड आणि राजस्थान रॉयल्सचा गोलंदाज जोफ्रा आर्चर ( Jofra Archer) याचं ७ वर्षांपूर्वीचं ट्विट व्हायरल होत आहे. IPL 2020 Fixed? मुंबई इंडियन्सच्या वादग्रस्त ट्विटनं फिक्सिंगच्या चर्चांना उधाण

जोफ्रा आर्चर ( Jofra Archer) हा सोशल मीडियावर नेहमी अॅक्टीव्ह असतो. त्याच्या जुन्या ट्विट्सचा नेहमी वर्तमानकाळाशी संबंध जोडला जातो आणि त्यामुळे त्याला ज्योतिषाचार्य असेही म्हटले जाते. त्यामुळेच मुंबईत आज अचानक वीजपुरवठा खंडित झाल्यानंतर आर्चरचे २०१३सालचे ट्विट व्हायरल होऊ लागले आहे. २२ मार्च २०१३ मध्ये आर्चरनं Lights Out असे ट्विट केलं होतं. त्याचा संदर्भ आजच्या घटनेशी जोडला जात आहे. महेंद्रसिंग धोनीच्या मुलीला धमकी; पाकिस्तानी क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदी म्हणतो...

दरम्यान, मुंबई वीजपुरवठा खंडित प्रकरणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ऊर्जा मंत्री डॉ. नितीन राऊत यांच्याशी चर्चा केली असून मुंबई आणि मुंबई महानगर क्षेत्रातील वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी तातडीने सर्वतोपरी प्रयत्न करावेत, अशा सूचना दिल्या आहेत. तसेच, भविष्यात परत अशी घटना घडू नये. यासाठी सतर्कता बाळगावी असेही त्यांनी सांगितले. मुंबईतील संपूर्ण वीज जाण्याच्या घटनेमागे कोणते तांत्रिक दोष आहेत. यासाठी कोण जबाबदार आहेत, त्याबाबत चौकशी करण्याचे निर्देशही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत.

डेव्हिड वॉर्नरची विकेट अन् जोफ्रा आर्चरला लागली लॉटरी; जिंकला 50 हजारांचा Xbox, पाहा कसारविवारी सनरायझर्स हैदराबाद ( Sunrisers Hyderabad ) संघाविरुद्धच्या सामन्यात आर्चरच्या अशाच एका ट्विटची चर्चा रंगली. १८ सप्टेंबरला आर्चरनं Xbox UKयांना टॅग करून एक ट्विट केलं होतं. त्यात त्यानं त्यांना एक प्रश्न विचारला होता आणि त्यावर Xbox UKकडून मजेशीर उत्तरही मिळालं. सोशल मीडियावरील या खेळात अखेरीस आर्चरनं बाजी मारली आणि त्याला ५० हजार किमतीच्या Xboxची लॉटरी लागली.

आर्चरनं १८ सप्टेंबरला ट्विट करून Xbox UKला विचारलं होतं की, नवीन Xboxसाठी मला IPL 2020मध्ये किती विकेट्स घ्याव्या लागतील? तेव्हा Xboxनं त्याला उत्तर देताना, फक्त एक विकेट आणि ती पण डेव्हिड वॉर्नरची! आज आर्चरनं SRHचा कर्णधार वॉर्नरचा त्रिफळा उडवला अन् आर्चरनं XboxUK यांना त्या ट्विटची आठवण करून दिली. Xbox UKने त्यांचा शब्द पाळून आर्चरकडे त्याचा पत्ता मागितला. आता त्याला ५० हजार किमतीच्या Xbox या नवीन गेमिंगची प्रतीक्षा आहे. 

टॅग्स :IPL 2020मुंबईजोफ्रा आर्चर