नवी दिल्ली – सध्या देशात कोरोना व्हायरसमुळे लॉकडाऊन सुरु आहे. गेल्या २ महिन्यापासून सुरु असणाऱ्या लॉकडाऊनमुळे अनेक कामकाज ठप्प पडलं आहे. क्रिकेट विश्वालाही याचा फटका बसला आहे. लॉकडाऊन काळात अनेक क्रिकेटर्स सोशल मीडियात मोठ्या प्रमाणात एक्टिव्ह झाल्याचं दिसून येतं. अनेक खेळाडू जुने फोटो शेअर करत आठवणी ताज्या करताना दिसतात.
यात भारताचा माजी फलंदाज युवराज सिंगने इन्स्टाग्रामवर एक जुना फोटो शेअर केला आहे. त्यात आशिष नेहरा, वीरेंद्र सेहवाग, व्हि.व्हि लक्ष्मणसोबत स्वत: युवराजही दिसत आहे. या कशाप्रकारे खेळाडू रांग लावत फोन वर बोलत असल्याचं त्याने सांगितले. फोटोत सर्व खेळाडू फोनवरुन बोलत असल्याचं दिसतं. युवराज सिंगने शेअर केलेल्या या फोटोला अनेक क्रिकेटपटूंनीही कमेंट्स केल्या आहेत तसेच या फोटोवरुन एकमेकांसोबत मज्जामस्करी करतानाही पाहायला मिळालं.
युवराज सिंगने हा फोटो शेअर करताना लिहिलं आहे की, जेव्हा तुमचे आई-वडील तुमच्या खराब प्रदर्शनानंतर फोनचं बिल देत नाहीत, हे ते दिवस आहेत जेव्हा मोबाईल फोन वापरत नव्हते. या फोटोत एका रांगेत सर्व खेळाडू फोनवरुन बोलताना दिसतात. हरभजन सिंगने या फोटोवर कमेंट केली आहे की, मोफत कॉल, त्यावर युवराज सिंग उत्तर देताना म्हणाला की, हरभजन सिंग हा कॉलिंग कार्ड आहे श्रीलंकापासून इंडियापर्यंत. मी पोहचलो असं आईला सांगत होतो तर नेहरा आपल्या पत्नीला आता मॅचनंतर फोन करतो असं बोलत होता.
अभिनेत्री नेहा धूपियानेही या फोटोवर कमेंट करताना लिहिलं आहे की, मागील काही काळात हा सर्वाधिक सुंदर फोटो आहे जो मी पाहिला आहे. युवराजची एक्स गर्लफ्रेंड किम शर्मा हिने हसतानाचा इमोजी पोस्ट केला आहे. तर भारताचा माजी गोलंदाज मुनाफ पटेल याने हा शानदार फोटो आहे अशी कमेंट केली आहे. यापूर्वी युवराज सिंगने इंडियन प्रीमियर लीगच्या दिवसाची आठवण करत एक व्हिडीओ पोस्ट केला होता.
अन्य महत्त्वाच्या बातम्या
क्रीडा विश्वात हळहळ! तीन ऑलिम्पिक सुवर्णपदक पटकावणारे बलबीर सिंग यांचे निधन
धक्कादायक! लॉकडाऊन तोडत भाजपाचे खासदार मनोज तिवारी क्रिकेट खेळले; ट्रोल झाले
... म्हणून आयपीएल-13 खेळवायला हवी; टीम इंडियाच्या 'गब्बर'चं लय भारी लॉजिक