Join us  

‘हैदराबाद संघटनेत लोढा शिफारशींवर अंमल नाही’ - माजी कर्णधार मोहम्मद अझहरुद्दीन

हैदराबाद क्रिकेट संघटना लोढा शिफारशींचा अंमल करीत नसून कामकाजात अनेक अनियमितता आहे. पदाधिकारी पदाचा दुरुपयोग करीत असल्याचा आरोप माजी कर्णधार मोहम्मद अझहरुद्दीन याने केला आहे.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2017 4:46 AM

Open in App

हैदराबाद : हैदराबाद क्रिकेट संघटना लोढा शिफारशींचा अंमल करीत नसून कामकाजात अनेक अनियमितता आहे. पदाधिकारी पदाचा दुरुपयोग करीत असल्याचा आरोप माजी कर्णधार मोहम्मद अझहरुद्दीन याने केला आहे.यंदा जानेवारीत अझहरचा एचसीए अध्यक्षपदाचा नामांकन अर्ज रद्द करण्यात आला होता. यावर संतापलेला अझहर म्हणाला,‘ योग्य खेळाडूंना मोईनुद्दोल्ला स्पर्धेसाठी संघात स्थान देण्यात येत नाही. ज्या खेळाडूंनी स्थानिक लीगमध्ये तीनपेक्षा अधिक शतके ठोकली किंवा पाच वा त्यापेक्षा बळी घेतले त्यांच्या नावाचा स्पर्धेसाठी विचारही करण्यात आला नाही हे दुर्दैवी आहे. निवड पॅनलच्या नियुक्तीतही लोढा शिफारशींचा अंमल झालेला नाही.’लोढा समितीच्या शिफारशीनुसार किमान २५ प्रथमश्रेणी सामने खेळलेल्या खेळाडूंना निवडकर्ता बनविण्यात यावे. एचसीएत सुरू असलेली अफरातफर चव्हाट्यावर आणण्याचे आवाहन अझहरने मीडियाला केले. दुसरीकडे एचसीए अध्यक्ष जी. विवेकानंद यांनी अझहरचे आरोप फेटाळले. ते म्हणाले,‘लोढा समितीच्या शिफारशींचा अंमल होत आहे की नाही यावर प्रशासकांच्या समितीचे लक्ष आहे. प्रकरण सर्वोच्च न्यायालयापुढे प्रलंबित असल्याने काही अडचण असल्यास अझहर सर्वोच्च न्यायालयाकडे दाद मागू शकतो.’