Join us  

टीम इंडियाचं संसदेत अभिनंदन! लोकसभा अध्यक्षांकडून रोहित शर्माचं कौतुक, Video 

रोहित शर्माच्या नेतृत्वातील टीम इंडियाने यंदाचा विश्वचषक जिंकला.

By ऑनलाइन लोकमत | Published: July 01, 2024 3:13 PM

Open in App

Lok Sabha Speaker And House Congratulates Indian Team : क्रिकेटच्या सर्वात लहान फॉरमॅटच्या विश्वषकात अर्थात ट्वेंटी-२० मध्ये भारतीय संघाने ऐतिहासिक कामगिरी केली. रोहित शर्माच्या नेतृत्वातील टीम इंडियाने यंदाचा विश्वचषक जिंकला. या विजयानंतर सर्वत्र जल्लोष साजरा केला जात आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वात भारतीय संघाने प्रथमच ट्वेंटी-२० विश्वचषकाचा किताब जिंकला. २०१३ पासून भारताला एकदाही आयसीसी ट्रॉफी जिंकता आली नव्हती. पण, टीम इंडियाने ट्वेंटी-२० विश्वचषक २०२४ च्या अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा १२ धावांनी पराभव करून विजेतेपद पटकावले. भारताच्या विजयानंतर संसदेत देखील हा विषय पोहोचला अन् लोकसभा अध्यक्षांनी टीम इंडियाचे अभिनंदन केले.

भारतीय संघाच्या विजयानंतर लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांच्यासह संपूर्ण सभागृहाने रोहित आणि कंपनीचे अभिनंदन केले. भारतीय संघाचे अभिनंदन करताना ओम बिर्ला म्हणाले की, भारतीय पुरुष क्रिकेट संघाने २९ जून २०२४ रोजी वेस्ट इंडिजमधील बार्बाडोस येथे ट्वेंटी-२० क्रिकेट विश्वचषक जिंकण्यात यश मिळवले हे तुमच्यासोबत शेअर करताना मला अत्यंत आनंद होत आहे.

ओम बिर्ला यांनी आणखी सांगितले की, या ऐतिहासिक विजयामुळे संपूर्ण देशात उत्साह संचारला आहे. सर्वत्र आनंदाचे वातावरण आहे. हा विजय निःसंशयपणे आपल्या सर्व तरुणांना आणि सर्व खेळाडूंना प्रेरणा देईल. माझ्या स्वत:च्या वतीने आणि संपूर्ण सभागृहाच्या वतीने मी भारतीय क्रिकेट संघाचे अभिनंदन करतो. मी कर्णधार रोहित शर्माचे अभिनंदन करतो आणि क्रिकेट संघाला भविष्यासाठी शुभेच्छा देतो.

भारताला वन डे विश्वचषकात अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाकडून पराभव पत्करावा लागला होता. पण, यावेळी रोहितसेनेने ट्रॉफीवर कब्जा केला. दरम्यान, २०१३ नंतर टीम इंडियाने पहिली आयसीसी ट्रॉफी उंचावताना दक्षिण आफ्रिकेला फायनलमध्ये पराभूत केले. संपूर्ण स्पर्धेत थंड पडलेली विराट कोहलीची बॅट फायनलमध्येच तळपली. अक्षर पटेलने मॅच विनिंग अष्टपैलू कामगिरी केली. २००७च्या वर्ल्ड कपमध्ये खेळाडू म्हणून वर्ल्ड कप उंचावणारा युवा रोहित, २०२४ मध्ये कर्णधार म्हणून जेतेपदाचा चषक उंचावताना भावनिक झालेला जगाने पाहिला. २०११ च्या वन डे वर्ल्ड कप स्पर्धेत न मिळालेल्या संधीचं दुःख अखेर त्याच्या मनातून दूर झाले असावे. मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविडला संघाने जेतेपदाच्या ट्रॉफीसह निरोप दिला. हार्दिक पांड्या व जसप्रीत बुमराह यांनी आफ्रिकेच्या हातातून सामना खेचून आणला. सूर्यकुमार यादने २०व्या षटकात घेतलेला कॅच आफ्रिकेच्या पराभवासाठी पुरेसा ठरला. भारताच्या ७ बाद १७६ धावांचा पाठलाग करताना आफ्रिकेला ८ बाद १६९ धावाच करता आल्या आणि भारताने ७ धावांनी सामना जिंकला. ६ चेंडूंत १६ धावा आफ्रिकेला करायच्या होत्या. हार्दिकने टाकलेला पहिलाच चेंडू डेव्हिड मिलरने सीमापार पाठवला होता, परंतु सूर्यकुमार यादवने अप्रतिम झेल घेतला. मिलर ( २१) रडत रडत मैदानाबाहेर गेला. हार्दिकने २०व्या षटकात आणखी एक विकेट घेऊन भारताचा विजय पक्का केला. 

टॅग्स :ट्वेंटी-20 वर्ल्ड कप 2024ओम बिर्लारोहित शर्मालोकसभा