जयपूर - दिल्लीबरोबर झालेल्या पहिल्या सामन्यात पंजाबच्या लोकेश राहुलने या सत्रातील सर्वात जलद अर्धशतक केले होते. राहुलने 14 चेंडूत अर्धशतक झळकावले होते. त्याच लोकेश राहुलच्या नावावर या सत्रातील सर्वात संथ अर्धशतकाची नोंद झाली आहे. काल झालेल्या राजस्थानविरुद्धच्या सामन्यात राहुलने 70 चेंडूत नाबाद 95 धावांची खेळी केली. पण संघाला विजय मिळवून देण्यात त्याची खेळी कमी पडली. एका बाजूने विकेट पडत असताना राहुल दुसऱ्या बाजूला संयमी फंलदाजी करत होता. राहुलने 48 चेंडूत अर्धशतक पूर्ण केलं. आयपीएलच्या या सत्रातील हे सर्वात संथ अर्धशतक म्हणून नोंद झाली आहे. राहुलने आतापर्यंत या सत्रात झालेल्या दहा सामन्यात दोन वेळा नाबाद राहत 53.75 च्या सरासरीने 471 धावा करत ऑरेंज कॅप आपल्या नावावर केली आहे. या सत्रात राहुलने चार अर्धशतके झळकावली आहेत.
राजस्थानविरोधात 95 धावांची मोठी खेळी करुन करूनही सामना हरण्याचा रेकॉर्ड राहुलच्या नावावर झाला आहे. राहुलने आठ वर्षापूर्वीचा नमन ओझाचा विक्रम मोडीत काढला आहे.
मोठी खेळी करुनही संघाला विजय मिळवून न देणारे खेळाडू
- लोकेश राहुल : 95 नाबाद ( 2018 राजस्थान )
- नमन ओझा - 94 (2010 चेन्नई )
- विराट कोहली - 92 ( 2018 मुंबई)