लोकेश राहुलची पाठराखण, सुनिल गावसकर झाले ट्रोल

सोशल मीडियावर चाहत्यांनी गावसकरांना चांगलेच धारेवर धरले. 

By ऑनलाइन लोकमत | Published: February 15, 2023 05:38 AM2023-02-15T05:38:08+5:302023-02-15T05:38:29+5:30

whatsapp join usJoin us
Lokesh Rahul's support, Gavaskar became a troll | लोकेश राहुलची पाठराखण, सुनिल गावसकर झाले ट्रोल

लोकेश राहुलची पाठराखण, सुनिल गावसकर झाले ट्रोल

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : पहिल्या कसोटीत ७१ चेंडूत  केवळ २० धावा काढणाऱ्या उपकर्णधार लोकेश राहुलला दुसऱ्या कसोटीत खेळवायला हवे? चाहत्यांच्या मनातील प्रश्नावर दिग्गजांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या.  माजी वेगवान गोलंदाज व्यंकटेश प्रसादने राहुलची निवड म्हणजे ‘पक्षपात’(फेव्हरिटिझम) असे संबोधले. त्यावर सुनील गावसकर यांनी राहुलला आणखी एक संधी मिळायला हवी, असे सांगून राहुलची पाठराखण केली. ‘फ्लॉप’ ठरूनही कसोटी संघातील नियमित खेळाडू असलेल्या राहुलला दिल्ली कसोटीत खेळवायला हवे, असे गावसकर यांना वाटते. त्याचवेळी शुभमन गिलसारखा खेळाडू राखीव बाकावर असल्याचेही त्यांचे मत आहे. सोशल मीडियावर चाहत्यांनी गावसकरांना चांगलेच धारेवर धरले. 

एक युजर म्हणाला, ‘राहुलला किती काळ झेलणार? राहुल नाव असणे यशाची गॅरंटी आहे काय? दुसऱ्या युजरने लिहिले, ‘बाहेरचा रस्ता दाखविण्याऐवजी त्याला कर्णधार नेमण्याच्या विचारात आहात! पृथ्वी शॉ सारख्यांचे काय होणार?’ अन्य एक जण लिहितो, ‘आयुष्यात मी कधी असा पक्षपात पाहिलेला नाही. राहुल पुढील मालिकेतही देशासाठी सलामीला खेळेल, असेच वाटत आहे.’

 

Web Title: Lokesh Rahul's support, Gavaskar became a troll

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.