पृथ्वी शॉची दीर्घ प्रतीक्षा संपली, भारतीय सलामीवीर संघात परतला, २ फेब्रुवारीला खेळणार!

भारतीय संघातील सलामीवीर पृथ्वी शॉ ( Prithvi Shaw) दुखातीतून पूर्णपणे बरा झाला आहे आणि त्याची  दीर्घ प्रतीक्षा संपली आहे. तो मैदानात परतण्याच्या तयारीत आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: February 1, 2024 10:42 AM2024-02-01T10:42:32+5:302024-02-01T10:42:54+5:30

whatsapp join usJoin us
long wait is over as Indian opener Prithvi Shaw set to make comeback on February 2 in this match  | पृथ्वी शॉची दीर्घ प्रतीक्षा संपली, भारतीय सलामीवीर संघात परतला, २ फेब्रुवारीला खेळणार!

पृथ्वी शॉची दीर्घ प्रतीक्षा संपली, भारतीय सलामीवीर संघात परतला, २ फेब्रुवारीला खेळणार!

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

भारतीय संघातील सलामीवीर पृथ्वी शॉ ( Prithvi Shaw) दुखातीतून पूर्णपणे बरा झाला आहे आणि त्याची  दीर्घ प्रतीक्षा संपली आहे. तो मैदानात परतण्याच्या तयारीत आहे. प्रदीर्घ कालावधीनंतर तो संघात परतला आहे. भारताचा युवा सलामीवीर पृथ्वी शॉ गुडघ्याच्या दुखापतीमुळे बराच काळ क्रिकेटच्या मैदानापासून दूर होता. आता तो मुंबईच्या संघात परतला आहे आणि २ फेब्रुवारीला बंगालविरुद्ध रणजी करंडक ब गटातील सामन्यात तो खेळमार आहे. हा सामना कोलकाता येथे होणार आहे. 


पृथ्वी शॉ गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये जखमी झाला होता. इंग्लंडमधील वन डे चॅम्पियनशिपदरम्यान डरहमविरुद्ध नॉर्थम्प्टनशायरकडून खेळताना तो जखमी झाला होता. त्यानंतर ते बंगळुरू येथील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीतील वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या देखरेखीखाली होता. एनसीएकडून मंजुरी मिळाल्यानंतरच मुंबई क्रिकेट असोसिएशनने त्याचा रणजी संघात समावेश केला. पृथ्वी जुलै २०२१ पासून भारतीय संघाबाहेर आहे. 


२०१८ मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या पृथ्वीने भारताकडून ५ कसोटीत ३३९ धावा आणि ६ वन डे सामन्यांमध्ये १८९ धावा केल्या आहेत. त्याने भारतासाठी एक ट्वेंटी-२० सामनाही खेळला आहे. पृथ्वी रणजी करंडक स्पर्धेत मुंबईच्या संघात अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखाली पुनरागमन करेल . मुंबई संघ एलिट गट ब मध्ये चार पैकी तीन विजय आणि एक पराभवासह २० गुणांसह अव्वल स्थानावर आहे. 

मुंबईचा संघ - अजिंक्य रहाणे, शिवम दुबे, पृथ्वी शॉ, जय बिस्ता, भूपेन लालवानी, अमोघ, सुवेद पारकर, प्रसाद पनवार, हार्दिक तोमर, सूर्यांश, तनुष, अथर्व अंकोलेकर, आदित्य धुमाळ, मोहित अवस्थी, धवल कुलकर्णी, रॉयस्टन डिस आणि एस. डी सुजा (  Ajinkya Rahane (c), Prithvi Shaw, Jay Bista, Bhupen Lalwani, Shivam Dube, Amogh Bhatkal, Suved Parkar, Prasad Pawar (wk), Hardik Tamore (wk), Suryansh Shedge, Tanush Kotian, Atharva Ankolekar, Aditya Dhumal, Mohit Avasthi, Dhawal Kulkarni, Royston Dias, Sylvester D’Souza. 

Web Title: long wait is over as Indian opener Prithvi Shaw set to make comeback on February 2 in this match 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.