Join us

नीट पाहा 83... हा कपिल नसून 'रणवीर', लूक पाहून घायाळ झाले क्रिकेटवीर

रणवीर सिंगने कपिलस्टाईलने विश्वचषक उंचावल्याचा फोटो रिलीज करण्यात आला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2020 15:57 IST

Open in App

मुंबई - अभिनेता रणवीर सिंगचाकपिल देवच्या भूमिकेत झळकणार आहे. सन 1983 च्या विश्वचषक संघाचा हिरो आणि तत्कालीन भारतीय संघाचा कर्णधार कपिल देव यांच्या जीवनावर आधारित चित्रपटात कपिल देवची भूमिका रणवीर सिंग साकारत आहे. यापूर्वी रणवीर आणि दीपिकाचा एक फोटो व्हायरल झाला होता. जो फोटो कपिल आणि त्यांच्या पत्नीच्या रुपात होता. आता, चित्रपटातील आणखी एक स्टील रिलीज झालं आहे. त्यातून, रणवीरने पुन्हा एकदा 1983 च्या इतिहासाची पुनरावृत्ती केलीय. 

रणवीर सिंगने कपिलस्टाईलने विश्वचषक उंचावल्याचा फोटो रिलीज करण्यात आला आहे. रणवीरने आपल्या इंस्टा अकाऊंटवरुन हा फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये कपिलने 1983 साली उंचावलेली ट्रॉफी दिसत असून रणवीरने तो विश्वचषक हाती घेतल्याचं दिसून येतंय. रणवीरच्या या फोटोला केवळ 3 तासांतच 10 लाख लाईक्स मिळाले आहेत. रणवीरने ट्विटरवरुनही हा फोटो शेअर केला आहे. 

महेश भूपतिच्या स्वँग फॅशन हब प्राइवेट लिमिटेड आणि रिलायंस एंटरटेनमेंटच्यावतीने हा मर्चेन्डाइज लॉन्च केला आहे. 10 एप्रिल रोजी रणवीरचा हा चित्रपट प्रदर्शित होत आहे. रणवीर सिंगचा हा लूक पाहून दिग्गज क्रिकेटवीर आणि वेस्ट इंडिजचा माजी तडाखेबाज फलंदाज ब्रायन लाराने प्रतिक्रिया दिलीय. या चित्रपटाची मी आतुरतेनं वाट पाहतोय, असे लाराने म्हटले आहे. 

टॅग्स :८३ सिनेमाकपिल देवरणवीर सिंगट्विटर