सनरायजर्स-केकेआर लढतीत कार्तिकच्या नेतृत्वावर नजर

सलामीच्या पराभवानंतर दोन्ही संघांना विजयाची गरज

By ऑनलाइन लोकमत | Published: September 26, 2020 01:32 AM2020-09-26T01:32:08+5:302020-09-26T01:33:13+5:30

whatsapp join usJoin us
A look at Karthik's leadership in the Sunrisers-KKR fight | सनरायजर्स-केकेआर लढतीत कार्तिकच्या नेतृत्वावर नजर

सनरायजर्स-केकेआर लढतीत कार्तिकच्या नेतृत्वावर नजर

whatsapp join usJoin usgoogleNewsNext


अबुधाबी : आयपीएलच्या सलामी लढतीत कोलकाता नाईट रायडर्सचा (केकेआर) कर्णधार दिनेश कार्तिकच्या रणनीतीवर टीका झाली होती. केकेआर संघ शनिवारी सनरायजर्स हैदराबादविरुद्धच्या सामन्यात संघाच्या विजयाचे खाते उघडण्यास उत्सुक आहे.
उभय संघांना सलामी लढतीत पराभव स्वीकारावा लागला आहे. त्यामुळे कार्तिक व वॉर्नर यांचे संघ १३ व्या पर्वात विजयाचे खाते उघडण्यास प्रयत्नशील आहेत.
केकेआर संघाने गेल्या मोसमाच्या तुलनेत संघात अनेक बदल केले, पण बुधवारी मुंबई इंडियन्सविरुद्धच्या लढतीत त्यांची रणनीती बघितल्यानंतर कार्तिकने पूर्वी केलेल्या चुकांपासून बोध घेतला नसल्याचे निदर्शनास आले. दरम्यान, सनरायजर्स हैदराबाद संघाची स्थिती पहिल्या लढतीत विशेष चांगली नव्हती.

वेदर रिपोर्ट । दिवसाचे तापमान ३७ डिग्री सेल्सियसच्या आसपास राहण्याची शक्यता, पण ह्युमिडिटी ५६ टक्के असू शकते. हवेचा वेग १८ किलोमीटर प्रतितास राहण्याची शक्यता.

पिच रिपोर्ट । या लढतीतही खेळपट्टी गोलंदाजांना अनुकूल राहील, पण फलंदाज स्थिरावले तर धावा होऊ शकतात.

मजबूत बाजू
कोलकाता। सुनील नारायणसारखा जागतिक दर्जाचा गोलंदाज आणि रसेल व मॉर्गन यांच्यासारखे फलंदाज संघात आहेत.
हैदराबाद । डेव्हिड वॉर्नर सलामीवीर व कर्णधार. केन विलियम्सनने पुनरागमन केले तर मधली फळी मजबूत. गोलंदाजी प्रभावशली. राशिद खान व भुवनेश्वर कुमार यांची उपस्थिती. राशिदच्या साथीला नबीला संधी मिळू शकते.

कमजोर बाजू
कोलकाता । कर्णधार दिनेश कार्तिक निर्णय घेण्याच्या क्षमतेत कमकुवत. फलंदाजी क्रमामध्येही अनेक उणिवा. गेल्या लढतीत रसेल व मॉर्गन यांना खालच्या स्थानावर फलंदाजीची संधी. नारायणलाही उशिरा गोलंदाजीला पाचारण.
हैदराबाद । मधली फळी ढेपाळणे. अष्टपैलू मिशेल मार्शची स्पर्धेतून माघार.

Web Title: A look at Karthik's leadership in the Sunrisers-KKR fight

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :IPL 2020IPL 2020