सिडनी : ऑस्ट्रेलिया ‘अ’ संघाविरुद्ध गुलाबी चेंडूने शुक्रवारपासून खेळल्या जाणाऱ्या दुसऱ्या सराव सामन्यात भारताची नजर दुसरा फिरकीपटू कुलदीप यादव व अतिरिक्त फलंदाज हनुमा विहारी यांच्यावर राहील. कारण १७ डिसेंबरपासून प्रारंभ होत असलेल्या दिवस-रात्र कसोटीसाठी ही लढत म्हणजे ‘ड्रेस रिहर्सल’प्रमाणे असेल. सिडनी क्रिकेट मैदानावर खेळला जाणारा हा सामना पहिल्या कसोटीच्या तयारीच्या दृष्टीने चांगली संधी असेल. तसे बघता येथील पाटा खेळपट्टी ॲडिलेड ओव्हलच्या खेळपट्टीच्या तुलनेत एकदम वेगळी असेल. इयान चॅपेलच्या मते ॲडिलेडच्या खेळपट्टीवर हिरवळ राहील.या लढतीत कदाचित विराट कोहली खेळणार नाही. कसोटीसाठी आपली तयारी वेगळी करणार असल्याचे त्याने संकेत दिले आहेत. हा रणनीतीचा भागही असू शकते. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटीच्या तयारीची यजमान संघाला कल्पना येऊ नये, यासाठी कदाचित ही खबरदारी घेण्यात येत असावी.टी-२० मालिकेनंतर कोहली म्हणाला होता,‘मी पूर्ण सामने खेळण्यावर विश्वास ठेवतो. मी फिजिओसोबत चर्चा करीत आणि आपल्या तयारीबबात निर्णय घेईल.’ऑस्ट्रेलियाचा उदयोन्मुख खेळाडू कॅमरुन ग्रीनकडे संघ व्यवस्थापनावर छाप सोडण्याची चांगली संधी असले. त्यात मिशेल स्वेपसनला पुढील वर्षी एससीजीवर होणाऱ्या तिसऱ्या कसोटीत संधी मिळण्याची आशा आहे. पहिल्या सराव सामन्यात भारतातर्फे अजिंक्य रहाणे व चेतेश्वर पुजारा यांनी पहिल्या डावात आणि रिद्धिमान साहने दुसऱ्या डावात चांगली फलंदाजी केली, पण यांचा अपवाद वगळता अन्य फलंदाजांनी निराश केले. भारतासाठी संघाचे संतुलन साधण्याची ही अखेरची संधी आहे. ३६ कसोटी सामन्यांचा अनुभव असलेल्या केएल राहुलला प्राधान्य देण्यात येते का, याबाबत उत्सुकता आहे. कारण मयांक अग्रवाल सलामीवीर फलंदाज म्हणून खेळणार असल्याचे निश्चित आहे. दर्जेदार सीम व स्विंग माऱ्यापुढे पृथ्वी शॉची कमककुवत बाजू चव्हाट्यावर आली आहे. त्यात शुभमन गिल उच्च पातळीवर स्वत:ला सिद्ध करू शकलेला नाही. अशा स्थितीत कोहली व शास्त्री अनुभवाला प्राधान्य देऊ शकतात.
प्रतिस्पर्धी संघभारत :- विराट कोहली (कर्णधार), अजिंक्य रहाणे, केएल राहुल, मयांक अग्रवाल, चेतेश्वर पुजारा, हनुमा विहारी, पृथ्वी शॉ, शुभमन गिल, आर अश्विन, रवींंद्र जडेजा, कुलदीप यादव, उमेश यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, नवदीप सैनी, ऋषभ पंत, रिद्धिमान साहा.ऑस्ट्रेलिया ‘अ’ : सीन एबोट, जो बर्न्स, एलेक्स कॅरी (कर्णधार), हॅरी कोंवे, कॅमरन ग्रीन, मार्कस हॅरिस, निक मेडिंसन, बेन मॅकडरमोट, मार्क स्टीकेटी , विल सदरलँड, मिशेल स्वेपसन, जॅक विल्डरमथ.