- एबी डिव्हिलियर्स लिहितात...
आम्हाला संगीताचे सूरही ऐकायला येत असून, प्रकाशाचा किरणही दिसत आहे. पण, अद्याप आम्हाला पार्टीमध्ये सहभागी होण्यासाठी प्रवेश घेण्याचा मार्ग शोधता आलेला नाही. ही चीड आणणारी बाब आहे. गुणतालिकेत सीएसके संघ सर्वात आघाडीवर आहे, पण अन्य संघ मात्र घोळक्यात आहेत. आयपीएलच्या यंदाच्या मोसमात मोठी प्रतिस्पर्धा अनुभवाला मिळत आहे. अन्य संघांप्रमाणे आमचाही संघ प्रेरित व प्रतिभावान आहे, पण निकाल मात्र आमच्या बाजूने लागत नाही.
किंग्स इलेव्हन पंजाबविरुद्ध मोहालीमध्ये मिळविलेल्या विजयानंतर आमचा सलग सहा सामन्यांतील पराभवाची मालिका खंडित झाली होती. आम्ही वानखेडे स्टेडियममध्ये मुंबई इंडियन्सविरुद्ध विजय मिळविण्याच्या दिशेने वाटचाल करीत होतो, पण असे घडले नाही. मुंबई संघाने घरच्या मैदानावर शानदार कामगिरी करीत आणखी एक विजय मिळविला आणि आम्ही विजयासमीप पुन्हा थबकलो. आम्हाला पुन्हा मोक्याच्या क्षणी चमकदार कामगिरी करता आली नाही.
महत्त्वाच्या लढतीत जर आम्ही नाणेफेक जिंकून लक्ष्याचा पाठलाग केला असता तर काय घडले असते. आम्ही हाफ चान्सेसचा लाभ घेण्यात यशस्वी ठरलो असतो किंवा सामना जिंकून देणारी खेळी करणाऱ्या हार्दिक पांड्याला सीमारेषेवर झेलचित करण्यात यशस्वी ठरलो असतो तर काय घडले असते? हा सर्व भ्रम आहे. आम्ही मुंबई इंडियन्सविरुद्ध चांगली लढत दिली, हे म्हणता येईल. मुंबईच्या वेगवान गोलंदाजांनी चेंडू दोन्ही बाजूला स्विंग केला, पण आम्ही चांगली फलंदाजी केली. मोईन अलीच्या शानदार अर्धशतकी खेळीच्या जोरावर आम्ही १७१ धावांची आव्हानात्मक मजल मारण्यात यशस्वी ठरलो. पण आम्ही पॉवर प्लेमध्ये मुंबईच्या फलंदाजांना रोखण्यात संघर्ष करीत असल्याचे दिसले, तरी मधल्या षटकांमध्ये आमच्या फिरकीपटूंनी आम्हाला सामन्यात परतविले. शेवटी हार्दिकच्या आक्रमक खेळीमुळे आम्हाला पराभव स्वीकारावा लागला.
आयपीएल २०१९ ची पार्टी सुरू असून, आम्ही अद्याप बाहेरच अडकलो आहोत. मुंबईत खेळल्या गेलेल्या या लढतीत मला दुखापतही झाली. त्यामुळे माझे डोके दुखत आहे. १९ व्या षटकांत जसप्रीत बुमराह गोलंदाजीसाठी आला. मी दोन चौकार लगावण्यात यशस्वी ठरलो, पण त्यानंतर जागतिक क्रमवारीतील अव्वल गोलंदाजाने एक शानदार यॉर्कर टाकला आणि पुढचा चेंडू बाऊन्सर टाकला. तो माझ्या हेल्मेटवर आदळला. वेदना तर नष्ट होतील, पण आम्ही अद्याप पार्टीमध्ये सहभागी होण्यास उत्सुक आहोत.
Web Title: Lost opportunity again at a critical moment
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.