चटगाव : मिळालेल्या संधीचे सोने कसे करायचे याचे उदाहरण दाखवून देत सलामीवीर ईशान किशनने २४ चौकार आणि १० खणखणीत षटकांराच्या मदतीने १३१ चेंडूंत २१० धावांची झंझावाती खेळी केली. बांगलादेशच्या गोलंदाजांची धूळधाण उडवताना ईशानने अनेक विक्रमांनाही गवसणी घातली. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वांत वेगवान द्विशतक करण्याचा विक्रम ‘पॉकेट डायनामाइट’ म्हणवल्या जाणाऱ्या ईशान किशनच्या नावावर नोंदवला गेला आहे.
ख्रिस गेलला टाकले मागे
बांगला देशविरुद्ध ईशान किशनने आंतरराष्ट्रीय एकदिवसीय क्रिकेटमधले सर्वांत वेगवान द्विशतक झळकावले. याबाबतीत त्याने ख्रिस गेलला मागे टाकले. वेगवान द्विशतक झळकविणाऱ्यांच्या यादीत सचिन-सेहवागचाही क्रमांक लागतो.
१,२१४ दिवसांनंतर विराटचे शतक
कोहलीने ९१ चेंडूंत ११ चौकार आणि दाेन षट्कारांच्या मदतीने ११३ धावांची खेळी केली. त्याने इशान किशनसोबत २९० धावांची भागीदारी केली. विराटने १२१४ दिवसांनंतर आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामन्यात शतक लगावले. माजी भारतीय कर्णधाराने २६५ एकदिवसीय सामन्यांत ५७.४७ च्या सरासरीने ४४ शतके झळकावली असून १२,४७१ धावा केल्या आहेत. या शतकासोबतच विराटने ऑस्ट्रेलियाच्या रिकी पाँटिंगच्या ७१ आंतरराष्ट्रीय शतकांच्या विक्रमाला मागे टाकले.
विक्रमांची आरास
बांगला देशविरुद्ध एकदिवसीय सामन्यात सर्वाधिक धावा करणारा भारतीय फलंदाज. याआधी हा विक्रम वीरेंद्र सेहवागच्या (१७५) नावे होता. एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वांत वेगाने १५० धावा करणारा भारतीय. बांगला देशविरुद्ध एकदिवसीय सामन्यात सर्वाधिक षटकार (१०) मारणारा भारतीय.
१,०५६ दिवसांनंतर शतक झळकावणारा भारतीय सलामीवीर. याआधी रोहित शर्माने जानेवारी २०२० मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध ११९ धावांची खेळी केली होती.
Web Title: Lost two matches in a row, but beat Bangladesh in the last match... Ishan kishan double hundred
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.