भारतीय संघाचा प्रमुख गोलंदाज जसप्रीत बुमराह ( Jasprit Bumrah) अखेर लग्न बंधनात अडकला. स्पोर्ट्स प्रेझेंटर संजना गणेशन ( Sanjana Ganesan) हिच्यासोबत त्यानं सोमवारी ( 15 March) लग्न केलं. जसप्रीतच्या लग्नाआधीच्या सर्व समारंभ ( pre-wedding rituals ) रविवारी पार पडले आणि आता आज लग्न झाले. जसप्रीतच्या लग्नाला फक्त २० पाहुण्यांना उपस्थिती होती आणि त्यांना मोबाईल सोबत राखण्यास मनाई करण्यात आलेली आहे. भारत-इंग्लंड ( India vs England) यांच्यातल्या चौथ्या कसोटीच्या आधी जसप्रीतनं सुट्टी मागितली होती आणि त्यामागे लग्न हे कारण असल्याची चर्चा गेले अनेक दिवस सुरू होती. अखेर त्या खऱ्या ठरल्या.
प्रेम, जर ते योग्य असेल, तर आपल्याला योग्य मार्ग दाखवतं, आम्ही दोघं नवीन प्रवास सुरू करत आहोत. आजचा दिवस हा माझ्या आयुष्यातील सर्वात आनंदाचा आहे आणि या नव्या प्रवासाच्या बातमी तुमच्यासोबत वाटताना आम्ही स्वतःला भाग्यवान समजतो. हा आनंद तुमच्याशिवाय अपूरा आहे, असे जसप्रीत बुमराहनं लिहिलं.
जसप्रीत बुमराह झाला महाराष्ट्राचा जावई!
संजना गणेशन ही स्टार स्पोर्ट्स इंडियासोबत काम करत असून त्यांच्यासाठी तिनं अनेक क्रिकेट, बॅटमिंटन आणि फुटबॉल स्पर्धांचे अँकरींग केले आहे. तिनं 2019च्या पुरुष क्रिकेट वर्ल्ड कप स्पर्धेचेही सूत्रसंचालन केलं होतं. पुणे येथील तिचा जन्म आहे. सिम्बॉससिस इंस्टीट्युटमधून तिनं B. Techचं शिक्षण पूर्ण केलं आहे. त्यात तिने गोल्ड मेडलही पटकावलं आहे. त्यानंतर 2013-14मध्ये सॉफ्टवेअर इंजिनियरींग केलं. व्हायरल झालेल्या व्हिडीओत संजना भारतीय गोलंदाजाची मुलाखत घेत आहे.