Join us  

लव्ह की अरेंज? स्मृती मानधनाचं बिनधास्त उत्तर; होणाऱ्या साथीदाराकडून आहेत दोन अपेक्षा 

भारतीय महिला संघाची ओपनर आणि महाराष्ट्राची लेक स्मृती मानधना हिनं शुक्रवारी ट्विटरच्या माध्यमातून चाहत्यांच्या प्रश्नांची उत्तर दिली.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 03, 2020 4:44 PM

Open in App

कोरोना व्हायरसमुळे सर्व क्रीडा स्पर्धा रद्द कराव्या लागल्या आहेत. त्यात 21 दिवसांच्या लॉकडाऊनमुळे खेळाडूंना आपापल्या घरीच रहावे लागत आहेत. मग अशा वेळी सोशल मीडियाच्या माध्यमातून खेळाडू आपल्या फॅन्सशी संवाद साधत आहेत. भारतीय महिला संघाची ओपनर आणि महाराष्ट्राची लेक स्मृती मानधना हिनं शुक्रवारी ट्विटरच्या माध्यमातून चाहत्यांच्या प्रश्नांची उत्तर दिली. यावेळी तिला साथीदार कसा हवा, हा प्रश्न विचारण्यात आला. तिनंही कोणतं कारण न देता साथीदाराकडून असलेल्या दोन अपेक्षा सांगितल्या.

बॉलिवूड गायिका कनिका कपूरमुळे संकटात सापडले होते 15 क्रिकेटपटू; समोर आला वैद्यकीय अहवाल

सध्या मानधना हिला सांगलीत होम क्वारंटाईन केल्याची माहिती महापालिकेचे आरोग्याधिकारी डॉ. रवींद्र ताटे यांनी दिली. स्मृतीला २५ मार्च रोजी होम क्वारंटाईन करण्यात आले असून ५ एप्रिल रोजी त्याची मुदत संपणार आहे. दररोज तिची विचारपूस केली जात असल्याचे त्यांनी सांगितले. 

मानधना फेबु्रवारीमध्ये ऑस्ट्रेलियामध्ये झालेल्या ट्वेंटी-20 वर्ल्ड कप क्रिकेट स्पर्धा खेळून आली होती. येथून भारतात आल्यानंतर ती २३ मार्चला मुंबईहून सांगलीला घरी परतली. याबाबत डॉ. ताटे म्हणाले की, ‘मानधना सांगलीत आल्याची माहिती महापालिकेला २५ मार्चला मिळाली. आम्ही तात्काळ जाऊन तिला होम क्वारंटाईन केले आहे. त्यानुसार दररोज जाऊन तिची तपासणी आणि ती घरीच आहे का, याची खातरजमा केली जात आहे.’ क्वारंटाईनमध्ये असलेल्या स्मृतीला होणारा साथीदार कसा हवा, अस प्रश्न विचारण्यात आला.   त्यावर ती म्हणाली,''1 - माझ्यावर प्रेम करणारा, 2 - पहिल्या अपेक्षाची पूर्तता करणारा.''  यावेळी तिला लव्ह की अरेंज मॅरेज असाही प्रश्न विचारला गेला. त्यावर तिनं लव्ह-अरेंज असं उत्तर दिलं.   

अन्य महत्त्वाच्या बातम्या

केव्हीन पीटरसन-विराट कोहलीची चर्चा सुरू असताना अनुष्कानं ऑर्डर सोडली अन्...

भारताच्या फिरकीपटूचे समाजकार्य, 350 गरीब कुटुंबांना मदत करण्याचा निर्धार

पंतप्रधान नरेंद्र मोदी व्हिडीओ कॉलवरून गांगुली, तेंडुलकर, कोहली, सेहवागशी संवाद साधणार

अजिंक्य रहाणेकडून राज्य सरकार अन् महानगरपालिकेच्या 'त्या' उपक्रमाचं कौतुक

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी क्रीडापटूंना सांगितले 'पाच' मंत्र, लोकांपर्यंत पोहोचवण्याचं आवाहन

इंग्लंडच्या जोफ्रा आर्चरची भविष्यवाणी; पंतप्रधान मोदींच्या आजच्या आवाहनानं खरी ठरली?

टॅग्स :भारतीय क्रिकेट संघभारतीय महिला क्रिकेट संघ