"गोऱ्या व्यक्तीवर प्रेम करते याचा अर्थ मला भारतीय असल्याची लाज वाटते, असा होत नाही!"

क्रिकेटपटूंचा जगभरात चाहतावर्ग आहे. त्यामुळे सोशल मीडियावर त्यांच्या आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या प्रत्येक हालचालींवर चाहत्यांची बारीक नजर असते

By स्वदेश घाणेकर | Published: September 30, 2020 05:28 PM2020-09-30T17:28:43+5:302020-09-30T17:29:13+5:30

whatsapp join usJoin us
‘Loving a white person doesn’t mean I am embarrassed to be an Indian’ – Glenn Maxwell’s fiancee after troll asks her to ditch him | "गोऱ्या व्यक्तीवर प्रेम करते याचा अर्थ मला भारतीय असल्याची लाज वाटते, असा होत नाही!"

"गोऱ्या व्यक्तीवर प्रेम करते याचा अर्थ मला भारतीय असल्याची लाज वाटते, असा होत नाही!"

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

क्रिकेटपटूंचा जगभरात चाहतावर्ग आहे. त्यामुळे सोशल मीडियावर त्यांच्या आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या प्रत्येक हालचालींवर चाहत्यांची बारीक नजर असते. अशात काही हौशी चाहते क्रिकेटपटूंच्या कुटुंबीयांना विशेषतः प्रेयसी किंवा पत्नीला ट्रोल करत असतात. असाच ट्रोल करण्याचा प्रकार ऑस्ट्रेलियन स्टार ग्लेन मॅक्सवेल याची होणारी पत्नी विनी रमण हिच्यासोबत घडला. पण, विनीनं या ट्रोलर्सकडे दुर्लक्ष न करता सडेतोड उत्तर देऊन त्याची बोलती बंद केली.

Indian Premier League ( IPL 2020) साठी ग्लेन मॅक्सवेल ( Glenn Maxwell) UAEत आहे. किंग्स इलेव्हन पंजाब ( KXIP) संघाचे तो प्रतिनिधित्व करत आहे. सोशल मीडियावर त्याच्या होणाऱ्या पत्नीला ट्रोल केलं जात आहे. 20 सप्टेंबरला ग्लेन आणि विनी यांनी सोशल मीडियावर फोटो पोस्ट केला होता. त्यावरून एका भारतीय व्यक्तीनं विनीला ट्रोल केले.  


त्यानंतर विनीनं ट्रोलर्सला सडेतोड उत्तर देण्याचे ठरवले. तिनं चांगलाच धडा शिकवला. आपण कोणासोबत आयुष्य घालवायचं हा सर्वस्वी माझा निर्णय आहे आणि त्यात रंग आणि राष्ट्रीयत्व हा मुद्दा येत नाही. विनी ही मेलबर्न येथे राहते आणि ती भारतीय वंशाची असून तेथे फार्मासिस्ट आहे. विनीनं त्या ट्रोलर्सला दिलेल्या प्रत्युत्तराचा स्क्रीन शॉटही शेअर केला.  

तिनं लिहीलं की,''मी अशा कमेंट्सना प्रत्युत्तर देत नाही. ट्रोलर्सना केवळ स्वतःकडे लक्ष वेधायचे असते, परंतु 6 महिन्यांच्या या लॉकडाऊनमध्ये माझ्याकडे बराच फावला वेळ आहे. त्यामुळे ट्रोलर्सकडे दुर्लक्ष करण्यापेक्षा त्यांना धडा शिकवण्याचा ही संधी आहे. वेगळ्या रंगरुपाच्या व्यक्तीवर प्रेम केल्याने तुम्ही विकले गेलात, असं होत नाही. गोऱ्या व्यक्तिशी प्रेम केलं, म्हणून मला भारतीय असल्याची लाज वाटते, असा अर्थ होत नाही. गोऱ्या व्यक्तिवर प्रेम करणं हा माझा निर्णय आहे आणि त्यामुळे लोकं काय विचार करतात, याची मला चिंता नाही.'' 
ग्लेन मॅक्सवेलनं विनीचं कौतुक केलं.  


17 मार्च 2020 मध्ये ग्लेन व विनी यांनी साखरपुडा केला.  

Web Title: ‘Loving a white person doesn’t mean I am embarrassed to be an Indian’ – Glenn Maxwell’s fiancee after troll asks her to ditch him

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.