Join us  

या संघानं ४५ धावांत All Out झाल्यावर जिंकली होती टेस्ट; टीम इंडियाला ते शक्य होईल?

कसोटी क्रिकेटमधील त्या खास रेकॉर्डसह जाणून घेऊयात कठीण परिस्थितून सावरत नवा इतिहास रचण्यासाठी टीम इंडियाला कशी निर्माण होईल विजयाची संधी, यासंदर्भातील खास स्टोरी

By ऑनलाइन लोकमत | Published: October 18, 2024 10:15 AM

Open in App

 IND vs NZ Lowest Test Scores Record : बंगळुरुच्या एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर रंगलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात भारतीय संघावर घरच्या मैदानात मोठी नामुष्की ओढावली. पहिल्या डावात भारतीय संघ अवघ्या ४६ धावांत ऑल आउट झाला. दुसऱ्या बाजूला जबरदस्त गोलंदाजीनंतर न्यूझीलंडच्या संघाने बऱ्यापैकी आघाडीही घेतली आहे. आता मुद्दा हा की, हा सामना निकाली लागेल का? त्यात या परिस्थितीत भारतीय संघ जिंकू शकेल का? असे प्रश्न चाहत्यांना पडू शकतात. याच उत्तर क्रिकेटच्या इतिहासातील एका खास रेकॉर्ड पाहिल्यावर मिळू शकते. कसोटी क्रिकेटच्या इतिहासात एक सामना असाही झालाय ज्यात संघानं पहिल्या डावात ४५ धावा करून कसोटी १३ धावांनी जिंकून दाखवलीये. कसोटी क्रिकेटच्या इतिहासातील त्या खास रेकॉर्डसह जाणून घेऊयात कठीण परिस्थितून सावरत नवा इतिहास रचण्यासाठी टीम इंडियाला कशी निर्माण होईल विजयाची संधी, यासंदर्भातील खास स्टोरी

तो संघ कुठला? ज्यांनी ४५ धावांत आटोपल्यावर जिंकला होता कसोटी सामना?

क्रिकेट कसोटीच्या इतिहासात पहिल्या डावात ४५ धावांत आटोपल्यावर सामना जिंकून देण्याचा खास विक्रम इंग्लंड संघाच्या नावे आहे. १८८७ मध्ये इंग्लंडच्या संघाने ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर हा पराक्रम करून दाखवला होता. या सामन्यात इंग्लंडच्या संघाला स्वस्तात आटोपल्यावर ऑस्ट्रेलिया संघाने पहिल्या डावात ११९ धावा केल्या होत्या. इंग्लंड विरुद्धच्या सामन्यात ऑस्ट्रेलियानं ७४ धावांची अल्प आघाडी घेतली. इंग्लंडनं दुसऱ्या डावात १८४ धावा करत यजमान ऑस्ट्रेलिया समोर १११ धावांचे टार्गेट सेट केले होते. या धावांचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाचा संघ ९७ धावांत आटोपला होता.  

टीम इंडियाला बंगळुरुचं मैदान मारण्यााठी काय करावं लागेल? 

कानपूर कसोटी सामन्यात भारतीय संघाने अशक्यप्राय वाटणारा सामना निकाली काढला होता. हाच जज्बा टीम इंडियाला आता किवी संघाविरुद्ध दाखवावा लागेल. पहिला दिवस पावसाच्या व्यत्ययामुळे वाया गेल्यामुळे दोन्ही संघाकडे ४ दिवस आहेत. यातील एक दिवस न्यूझीलंडनं गाजवला आहे. तिसऱ्या दिवसाच्या खेळात न्यूझीलंड संघाला कमीत कमी धावात रोखून याच दिवशी टीम इंडिया दुसऱ्या डावातील बॅटिंगसाठी मैदानात उतरण्यासाठी प्रयत्नशील असेल. जर भारतीय संघ अखेरच्या दिवसाआधी न्यूझीलंडसमोर १८० ते २०० धावांचे टार्गेट सेट करण्यात यशस्वी झाला तरी या सामन्याचा निकाल टीम इंडियाच्या बाजूनं लागू शकतो. 

टॅग्स :भारतीय क्रिकेट संघन्यूझीलंडइंग्लंडआॅस्ट्रेलिया