Join us  

T20I मध्ये ३१ धावांत All Out झाला 'हा' संघ; आधी ४ वेळा केला यापेक्षाही कमी स्कोअर

Lowest Total in T20I: या संघाने तब्बल ४ वेळा ३१ पेक्षाही कमी धावसंख्या केली आहे

By ऑनलाइन लोकमत | Published: September 10, 2024 1:31 PM

Open in App

Lowest Total in T20I: T20 क्रिकेट हा फलंदाजांचा खेळ म्हणला जातो. क्रिकेटच्या या फॉरमॅटमध्ये गोलंदाजांना फारशी चमक दाखवायला संधी नसते कारण वेगाने धावा करण्याच्या प्रयत्नात फलंदाज मोठ-मोठी धावसंख्या उभारतात. पण आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेटमध्ये मंगोलिया मात्र काही वेगळाच प्रयत्न करताना दिसत आहे.  T20 आंतरराष्ट्रीयमध्ये सर्वात कमी धावसंख्या करण्याचे सर्वच रेकॉर्ड्स मंगोलियाच्या टीमकडे आहेत. एकदा नव्हे तर अनेक वेळा टी२० मधील सर्वात कमी धावसंख्येच्या यादीत (T20I lowest total) त्यांचा समावेश झाला आहे. ICC Men's T20 World Cup Asia Qualifier A च्या ताज्या सामन्यात मंगोलियाचा संघ अवघ्या ३१ धावांत ऑल-आऊट झाला आहे.

एकालाही गाठता आला नाही दुहेरी आकडा

मंगोलियाचा डाव ३१ धावांत गडगडला. एक वेळ अशी होती की, संघाच्या स्कोअर बोर्डवर कोणत्याही फलंदाजापेक्षा जास्त धावा या अतिरिक्त स्वरूपाच्या होत्या. मलेशियाच्या गोलंदाजांनी सामन्यात एकूण १३ अतिरिक्त धावा दिल्या. त्यांच्या एकाही फलंदाजाने दुहेरी आकडा गाठला नाही. सलामीवीर मोहन विवेकानंदनने संघाकडून सर्वाधिक ८ धावा केल्या. यानंतर, ११व्या क्रमांकाचा फलंदाज ४ धावा करत नाबाद राहिला. ती दुसऱ्या क्रमांकाची सर्वोत्तम धावसंख्या होती.

T20I मध्ये चार वेळा ३१ पेक्षाही कमी धावसंख्या

मंगोलियाच्या संघाचा ९ सप्टेंबरला मलेशिया विरुद्ध सामना झाला. या सामन्यात मंगोलियाने केवळ ३१ धावा केल्या. विशेष म्हणजे ही त्यांची सर्वात कमी धावसंख्या नाही. T20I मध्ये यापेक्षा कमी धावा त्यांनी तब्बल ४ वेळा केल्या आहेत. त्यांचे हे सर्व सामने गेल्या चार महिन्यांतील आहेत. मलेशियाविरुद्ध केलेल्या ३१ धावा ही मंगोलियाची T20I मधील ५व्या क्रमांकावरील सर्वात कमी धावसंख्या आहे. ५ सप्टेंबर २०२४ला मंगोलियाचा संघ सिंगापूरविरुद्ध अवघ्या १० धावांत ऑलआऊट झाला. जो एक लाजिरवाणा विश्वविक्रम झाला. यापूर्वी, ८ मे २०२४ रोजी जपानविरुद्ध मंगोलियाचा संघ केवळ १२ धावां बाद झाला. ३१ ऑगस्ट २०२४ रोजी मंगोलियाने हाँगकाँगविरुद्ध सर्वबाद १७ धावा केल्या. ९ मे रोजी जपानविरुद्धच्या सामन्यात मंगोलियाचा संघ २६ धावांवर ऑलआऊट झाला होता.

टॅग्स :टी-20 क्रिकेटट्वेंटी-20 वर्ल्ड कप 2024मलेशिया