Join us  

Matthew Wade, IPL 2022 : ३९६४ दिवसांनंतर या खेळाडूचे आयपीएलमध्ये पुनरागमन; Gujarat Titansच्या विजयात उचलला महत्त्वाचा वाटा

IPL 2022 T20 Match LSG vs GT : इंडियन प्रीमिअर लीगच्या १५ व्या पर्वातील पदार्पणाच्या सामन्यात गुजरात टायटन्सने विजय मिळवला.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 29, 2022 4:20 PM

Open in App

IPL 2022 T20 Match LSG vs GT : इंडियन प्रीमिअर लीगच्या १५ व्या पर्वातील पदार्पणाच्या सामन्यात गुजरात टायटन्सने विजय मिळवला. लखनौ सुपर जायंट्स या नवख्या संघाविरुद्ध गुजरातने ५ विकेट्स व २ चेंडू राखून विजय मिळवला. ( Lucknow Super Giants Vs Gujarat Titans). मोहम्मद शमी, हार्दिक पांड्या, राहुल तेवतिया, डेव्हिड मिलर आणि मॅथ्यू वेड हे गुजरातच्या विजयाचे शिल्पकार ठरले. यापैकी एक खेळाडू तब्बत ३९६४ दिवसांनी आयपीएलमध्ये खेळला आणि पुनरागमनाच्या सामन्यात धमाका उडवून दिला. आयपीएलमध्ये पुनरागमनासाठी सर्वाधिक काळ घेण्याचा विक्रम या खेळाडूच्या नावावर नोंदवला गेला.   

लखनौच्या दीपक हुडा ( ५५)  व आयूष बदोनी ( ५४) यांच्या अर्धशतकांच्या जोरावर लखनौने १५९ धावांचे लक्ष्य उभे केले. मोहम्मद शमीने २५ धावांत ३ विकेट्स घेतल्या. प्रत्युत्तरात हार्दिक व  मॅथ्यू वेडने गुजरातला विजयाच्या मार्गावर ठेवले होते. वेड ३० आणि हार्दिक ३३ धावांवर माघारी परतले.  लखनौचे पारडे जड वाटत असताना राहुल तेवतिया ( Rahul Tewatia) व डेव्हिड मिलर यांनी बाजी पलटवली. या दोघांनी ३४ चेंडूंत ६० धावांची भागीदारी केली.  मिलर २१ चेंडूंत ३० धावा करून बाद झाला.  तेवतियाने २४ चेंडूंत ५ चौकार व २ षटकारांसह नाबाद ४० धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली. अभिनव मनोहरने ७ चेंडूंत नाबाद १५ धावा केल्या. 

११ वर्षांनंतर मॅथ्यू वेडचे पुनरागमन ३९६४ दिवसानंतर मॅथ्यू वेडचे आयपीएलमध्ये पुनरागमन झाले. मे २०११मध्ये दिल्ली डेअरडेव्हिल्स विरुद्ध पुणे वॉरियर्स या सामन्यात तो खेळला होता. त्यानंतर तो आज मैदानावर उतरला. कॉलिन इंग्राम ( मे, २०११ - दिल्ली वि. पुणे) २८६४ दिवसांनंतर मे २०१९ मध्ये खेळला. जिमी निशॅम ( २३१४ दिवस), एस गोस्वामी ( २१८३) आणि अनुरीत एस ( २१५३) हे बऱ्याच दिवसांनी आयपीएलमध्ये कमबॅक करणारे खेळाडू ठरले आहेत. २०११मध्ये त्याने ३ सामन्यांत २२ धावा केल्या होत्या. मागच्या वर्षी पार पडलेल्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप विजयात ऑस्ट्रेलियाच्या वेडने सिंहाचा वाटा उचलला होता. त्यामुळे आयपीएल ऑक्शनमध्ये त्याची डिमांड वाढली. गुजरातने २.४० कोटींत त्याला आपल्या ताफ्यात घेतले.

 

टॅग्स :आयपीएल २०२२गुजरात टायटन्सलखनौ सुपर जायंट्स
Open in App