Join us  

IPL 2023, LSG vs MI: वडील १० दिवस ICU मध्ये होते, हे मी त्यांच्यासाठी केलं; LSG चा 'मॅच विनर' मोहसिन खान झाला भावुक

IPL 2023, LSG vs MI: मुंबई विरुद्ध लखनौ हा सामना दोन्ही संघांसाठी महत्त्वाचा होता. सामना जिंकला असता तर मुंबई इंडियन्स गुणतालिकेत थेट दुसऱ्या क्रमांकावर गेली असती.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 17, 2023 10:52 AM

Open in App

मुंबई इंडियन्सच्या हातातोंडाशी आलेला विजयाचा घास हिरावून घेत लखनौ सुपरजायंट्सच्या विजयाचा शिल्पकार ठरलेला उदयोन्मुख गोलंदाज मोहसिन खान सामन्यानंतर काहीसा भावुक झाला होता. शेवटची ओव्हर.. मुंबईला फक्त ११ धावांची गरज.. समोर टीम डेव्हीड आणि कॅमेरून ग्रीन यांच्यासारखे तडाखेबंद फलंदाज.. 'प्ले ऑफ'च्या दृष्टीने विजय आवश्यक... घरचं मैदान असल्यानं अपेक्षांचं ओझं.. अशा सगळ्या परिस्थितीत मोहसिननं शांत डोक्यानं गोलंदाजी केली आणि लखनौसाठी विजय खेचून आणला. स्वाभाविकच, हे सोपं नव्हतं. ही कामगिरी आपण आपल्या वडिलांसाठी केली, असं मोहसिननं आनंदानं सांगितलं. 

गेले दहा दिवस माझे वडील आयसीयूमध्ये होते. आजच त्यांना डिस्चार्ज मिळाला. ते घरी आलेत. हा कालावधी माझ्यासाठी अडचणींचा होता. मी आज जे केलं ते त्यांच्यासाठीच... त्यांनी आजचा सामना पाहिला असेल अशी आशा आहे, अशा भावना मोहसिन खाननं सामन्यानंतर व्यक्त केल्या. दुखापतीमुळे मोहसिनला बऱ्याच सामन्यांना मुकावं लागलं होतं. त्यामुळे शेवटची ओव्हर त्याला देणं जरा जोखमीचं होतं. पण कर्णधार कृणाल पांड्यानं त्याच्यावर विश्वास दाखवला आणि तो सार्थ ठरवत मोहसिननं दणक्यात कमबॅक केलं. पाहा संपूर्ण स्कोअरकार्ड

स्कोअरबोर्ड पाहिलाच नाही!

शेवटच्या ओव्हरमध्ये मनात काय सुरू होतं, याबद्दलही मोहसिन खान भरभरून बोलला. सरावादरम्यान मी काही रणनीती डोक्यात ठरवल्या होत्या, त्यानुसारच गोलंदाजी केली. कृणालही माझ्याशी चर्चा करत होता. मी स्वतःला शांत ठेवायचा प्रयत्न करत होतो. स्कोअरबोर्ड न पाहताच मी सहा चेंडू अचूक टाकले. रन-अप बदलला नव्हता, तर धिम्या गतीने चेंडू टाकायचा प्रयत्न केला, यॉर्करचाही वापर केला, असं त्यानं सांगितलं. 

प्ले ऑफमध्ये जाण्याचं गणित नाही माहित, पण...; रोहित शर्मा पराभवानंतर बरंच बोलला

मुंबई इंडियन्सने 'माती' खाल्ली; सूर्यकुमारच्या विकेटने मॅच फिरली, LSG ची भरारी

मुंबई इंडियन्सची धाकधूक वाढली

लखनौ - मुंबई हा सामना दोन्ही संघांसाठी महत्त्वाचा होता. सामना जिंकला असता तर मुंबई इंडियन्स गुणतालिकेत थेट दुसऱ्या क्रमांकावर गेली असती. मात्र, मुंबईला हरवल्यानं लखनौचा संघ तिसऱ्या स्थानी पोहोचलाय, तर मुंबई एक घर खाली - चौथ्या नंबरवर घसरलीय. त्यामुळे आता रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर आणि पंजाब किंग्स हे संघ मुंबईची डोकेदुखी वाढू शकतात. बेंगलोर आणि पंजाब प्रत्येकी १२ गुणांसह अजूनही प्ले ऑफच्या शर्यतीत आहेत. दोघांचे प्रत्येकी २ सामने शिल्लक आहेत आणि ते जिंकल्यास त्यांचेही १६ गुण होतील. मुंबईचा एकच सामना शिल्लक आहे आणि तो 'डू ऑर डाय' असेल.

टॅग्स :आयपीएल २०२३मुंबई इंडियन्सलखनौ सुपर जायंट्स
Open in App