shikhar dhawan and sam curren । लखनौ : आयपीएलच्या १६व्या हंगामातील एकविसावा सामना लखनौ सुपर जायंट्स आणि पंजाब किंग्ज यांच्यात होत आहे. शिखर धवनच्या नेतृत्वातील पंजाबच्या संघाने ४ सामन्यांमधील २ सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे. पण आजच्या सामन्यात शिखर धवनला विश्रांती देण्यात आली असून सॅम करनच्या नेतृत्वात पंजाब यजमान लखनौशी भिडणार आहे. तर लोकेश राहुलच्या नेतृत्वातील लखनौ सुपर जायंट्सने ४ सामन्यातील ३ सामने जिंकून शानदार सुरूवात केली आहे. लखनौला केवळ चेन्नई सुपर किंग्जकडून १ पराभव पत्करावा लागला आहे.
दरम्यान, आजच्या सामन्यासाठी पंजाब किंग्जने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे यजमान लखनौचा संघ आज प्रथम फलंदाजी करताना दिसेल.
पंजाब किंग्जला त्यांच्या शेवटच्या सामन्यात गतविजेत्या गुजरातकडून पराभव स्वीकारावा लागला होता. मोहालीत झालेल्या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना पंजाबने ८ गडी गमावून १५३ धावा केल्या. प्रत्युत्तरात गुजरात टायटन्सच्या संघाने १९.५ षटकांत ४ गडी गमावून लक्ष्य गाठले. खरं तर कमी धावसंख्या असतानाही पंजाबच्या गोलंदाजांनी कमाल करून सामन्यात रंगत आणली. पण राहुल तेवतिया पुन्हा एकदा महत्त्वाच्या क्षणी गोलंदाजासाठी काळ ठरला. तेवतियाने २ चेंडूत केलेल्या ५ धावांनी गुजरातच्या विजयावर शिक्कामोर्तब झाला. खरं तर गुजरातविरूद्धच्या सामन्यानंतर धवनने आपल्या फलंदाजांवर नाराजी व्यक्त केली होती.
शिखर धवनने काय म्हटले होते?
पंजाब किंग्जला आपल्या घरच्या मैदानावर पराभवाचा सामना करावा लागला. घरच्याच मैदानावर झालेल्या पराभवानंतर कर्णधार शिखर धवनने फलंदाजांवर टीकास्त्र सोडले. सामन्यानंतर फलंदाजांच्या धिम्या खेळीबद्दल बोलताना धवनने म्हटले, "आम्ही जास्त धावा केल्या नाहीत या गोष्टीशी मी सहमत आहे. जर तुम्ही डॉट बॉल पाहिले तर आम्ही एकूण ५६ डॉट बॉल खेळले, त्यामुळेच सामना हरलो. त्यामुळे आम्हाला या गोष्टीवर काम करण्याची गरज आहे. जेव्हाही आघाडीचे खेळाडू लवकर बाद होतात तेव्हा संघावर दबाव येतो. पण आम्हाला यातून मार्ग काढायला हवा. आमच्या फलंदाजांना अधिक धावा कराव्या लागतील मगच गोलंदाजांना लढण्याची संधी मिळेल."
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"
Web Title: LSG vs PBKS Punjab Kings have won the toss and they've decided to bowl first, Sam Curran to captain Punjab Kings tonight, Shikhar Dhawan not playing due to a niggle
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.