Join us  

कोहली-गंभीरची 'नवीन' लढाई! अफगाणी खेळाडूनं आगीत ओतलं तेल; गौतमची मिळाली साथ

virat kohli and naveen ul haq ipl 2023 : आयपीएलमध्ये लखनौ आणि बंगळुरू यांच्यातील सामना अनेक नाट्यमय घडामोडींमुळे चर्चेत राहिला.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 07, 2023 1:20 PM

Open in App

LSG vs RCB, virat kohli and naveen ul haq । नवी दिल्ली : विराट कोहलीसोबतच्या वादानंतर लखनौ सुपर जायंट्चा गोलंदाज नवीन-उल-हक चांगलाच चर्चेत आला आहे. अफगाणिस्तानच्या खेळाडूची इंन्स्टाग्राम पोस्ट आता चर्चेचा विषय बनली आहे. त्याने आता 'नवीन' वादाला फोडणी देत गौतम गंभीरसोबतचा एक फोटो शेअर केला आहे. याशिवाय त्याने लिहलेल्या कॅप्शनला खुद्द गंभीरने दाद दिली आहे. खरं तर याचा संबंध विराट कोहलीशी जोडला जात आहे.  दरम्यान, सोशल मीडियावर गौतम गंभीरसोबत फोटो शेअर करत नवीन उल हकने लिहिले, "लोकांशी तसाच व्यवहार करा, जसे तुम्हाला वागायचे आहे. तुम्हाला ज्या पद्धतीने बोलायचे आहे, त्याच पद्धतीनेच लोकांशी बोला." तसेच पोस्टमध्ये नवीनने गौतम गंभीरला GOAT देखील म्हटले आहे. अफगाणिस्तानच्या या खेळाडूच्या पोस्टवर प्रतिक्रिया देताना गौतम गंभीरने लिहिले, "तुम्ही जसे आहात तसेच राहा, कधीही बदलू नका." नवीन आणि गंभीरची ही जुगलबंदी चाहत्यांमध्ये चर्चेचा विषय आहे.

सोशल मीडियावरून 'नवीन' प्रत्युत्तरया आधी देखील नवीन-उल-हकने सोशल मीडियाच्या माध्यमातून विराट कोहलीला प्रत्युत्तर दिले आहे. "तुम्ही ज्यासाठी पात्र असता ते मिळतेच आणि हो हे असेच झाले पाहिजे. गोष्टी अशाच चालत राहिल्या पाहिजेत", अशा शब्दांत नवीनने कोहलीसोबतच्या वादावर आपली पहिली प्रतिक्रिया दिली होती.

नेमकं काय आहे प्रकरण?आयपीएलमध्ये लखनौ सुपर जायंट्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांचा सामना अनेक नाट्यमय घडामोडींमुळे चर्चेत राहिला. त्या सामन्यात विराट कोहली आणि नवीन-उल-हक नंतर कोहली आणि गौतम गंभीर यांच्यात बाचाबाची झाल्याचे पाहायला मिळाले होते.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

टॅग्स :आयपीएल २०२३गौतम गंभीरविराट कोहलीऑफ द फिल्डरॉयल चॅलेंजर्स बेंगलोरलखनौ सुपर जायंट्स
Open in App