Join us  

India vs New Zealand T20: हार्दिक पंड्याच्या नाराजीनंतर मोठी कारवाई, इकाना स्टेडियमचा पिच क्युरेटर निलंबीत

India vs New Zealand T20: भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील तीन सामन्यांची ट्वेन्टी-२० मालिका सध्या १-१ अशा बरोबरीत आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: January 31, 2023 11:08 AM

Open in App

India vs New Zealand T20: भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील तीन सामन्यांची ट्वेन्टी-२० मालिका सध्या १-१ अशा बरोबरीत आहे. मालिकेतील दुसरा सामना रविवारी लखनौच्या इकाना स्टेडियमवर खेळविण्यात आला. सामना क्रिकेट चाहते आणि दोन्ही संघांसाठी अतिशय निराशाजनक असा ठरला. कारण खेळपट्टी पूर्णपणे गोलंदाजीसाठी पोषक अशी होती. 

सामन्यात दोन्ही संघ फक्त १०० धावांपर्यंत कसेबसे पोहोचू शकले. महत्वाची बाब अशी की ट्वेन्टी-२० सामना असूनही दोन्ही संघाकडून एकही षटकार सामन्यात पाहायला मिळाला नाही. न्यूझीलंडनं भारतीय संघाला अवघ्या १०० धावांचं टार्गेट दिलं होतं. प्रत्युत्तरात भारतीय संघाला देखील घाम फुटला. भारतीय संघनंही कसंबसं हे आव्हान अखेरच्या षटकात गाठलं आणि सामना ६ विकेट्सनं जिंकला. 

धक्का देणारी खेळपट्टी- हार्दिक पंड्याभारतीय संघाचा कर्णधार हार्दिक पंड्यानंही सामन्यानंतर खेळपट्टीबाबत नाराजी व्यक्त केली. "मी अतिशय प्रामाणिकपणे सांगतो ही खेळपट्टी धक्का देणारी होती. मला कठीण खेळपट्टीनं फरक पडत नाही. मी त्यासाठी पूर्णपणे तयार आहे, पण या दोन्ही खेळपट्ट्या ट्वेन्टी-२० क्रिकेटसाठी तयार केल्या गेल्या नव्हत्या", असं हार्दिक पंड्या म्हणाला. यानंतर इकाना स्टेडियमच्या व्यवस्थापनानं यावर निर्णय घेत पिच क्युरेटरला पदावरुन दूर करण्यात आलं आहे. 

षटकाराविना झाला संपूर्ण सामनागोलंदाजीला अशी पूर्णपणे मदत करणारी खेळपट्टी फार क्वचितच पाहायला मिळते. जिथं फलंदाज एक धाव काढण्यासाठीही खूप कष्ट करताना दिसला. भारत आणि न्यूझीलंडच्या दुसऱ्या ट्वेन्टी-२० सामन्यात एक वेगळाच विक्रम देखील नोंदवला गेला. सामन्यात एकूण २३९ चेंडू टाकले गेले पण एकही षटकार पाहायला मिळाला नाही. सामन्यात एकूण १६ जणांनी फलंदाजी केली आणि एकूण फक्त १८३ धावाच झाल्या. संपूर्ण सामन्यात फक्त १४ चौकार पाहायला मिळाले.

टॅग्स :हार्दिक पांड्या
Open in App