विराट कोहलीला नडणाऱ्याने घेतली MS धोनीची भेट; सोशल मीडियावर रंगली दोघांच्या फोटोची चर्चा

लखनौचा वेगवान गोलंदाज नवीन उल हक याने चेन्नईचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी याची भेट घेतली.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 4, 2023 01:18 PM2023-05-04T13:18:55+5:302023-05-04T13:19:45+5:30

whatsapp join usJoin us
Lucknow fast bowler Naveen Ul Haq met Chennai captain Mahendra Singh Dhoni. | विराट कोहलीला नडणाऱ्याने घेतली MS धोनीची भेट; सोशल मीडियावर रंगली दोघांच्या फोटोची चर्चा

विराट कोहलीला नडणाऱ्याने घेतली MS धोनीची भेट; सोशल मीडियावर रंगली दोघांच्या फोटोची चर्चा

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

लखनौ सुपरजायंट्स आणि चेन्नई सुपरकिंग्ज यांच्यातील सामना जोरदार पावसामुळे रद्द करण्यात आला. लखनौच्या डावातील अखेरच्या षटकात पावसाचे आगमन झाले. यानंतर पाऊस कायम राहिल्याने अखेर सामना रद्द करण्याचा निर्णय झाला. यामुळे दोन्ही संघांना प्रत्येकी एका गुणावर समाधान मानावे लागले. खेळ थांबला तेव्हा लखनौने प्रथम फलंदाजीचे निमंत्रण मिळाल्यानंतर १९.२ षटकांत ७ बाद १२५ धावा केल्या होत्या.

'आता तु मला शिकवणार?'; विराट कोहली अन् गौतम गंभीर एकमेकांना नेमकं काय म्हणाले...पाहा

विशेष म्हणजे सामना रद्द झाल्यानंतर गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असणाऱ्या लखनौचा गोलंदाज आणि अफगाणिस्तानचा गोलंदाज नवीन उल हक याने चेन्नईचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी याची भेट घेतली. या भेटीचा फोटो लखनौ सुपर जायट्सने आपल्या अधिकृत ट्विटर हँडरद्वारे शेअर केला आहे. या फोटोची चर्चा सध्या सोशल मीडियावर रंगली आहे.

दरम्यान आरसीबीविरुद्धच्या सामन्यात लखनौ संघातील नवीन उल हक, संघाचे मार्गदर्शक गौतम गंभीर आणि आरसीबीचा फलंदाज विराट कोहली यांच्यात वाद झाला होता. सामना संपल्यानंतर खेळाडू हस्तांदोलन करीत होते. अफगाणिस्तानचा नवीन उल-हक आणि कोहली यांच्यात वाद सुरु झाला. कोहलीला त्याच्या सहकाऱ्यांनी लांब नेले. तत्पूर्वी, नवीन फलंदाजी करीत असताना विराटसोबत त्याची बाचाबाची झाली होती. कोहली खूपच आक्रमक दिसत होता. सामन्यादरम्यान अनेक खेळाडूंसोबत त्याचा वाद झाला. नवीन-उल-हक याच्यापासून वादाची सुरुवात झाली. यानंतर तो अमित मिश्रा आणि गौतम गंभीर यांच्याशीही भिडला. अखेर लोकेश राहुल आणि इतर खेळाडूंनी मध्यस्थी केल्यानंतर हा वाद मिटला. 

तिघांवर बीसीसीआयची कारवाई-

दोघांवरही बीसीसीआयने आचारसंहिता भंग केल्याप्रकरणी सामना शुल्काच्या शंभर टक्के रकमेचा दंड ठोठावला आहे. कोहली- गंभीर यांनी गुन्हा कबूल केला असून लखनौचा नवीन उल हक याच्यावर ५० टक्के रकमेचा दंड आकारण्यात आला.

Web Title: Lucknow fast bowler Naveen Ul Haq met Chennai captain Mahendra Singh Dhoni.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.