IPL 2022 मध्ये नव्याने सामील झालेल्या लखनौ संघाचं नावं अखेर ठरलं. लखनौचा संघ आता लखनौ सुपर जायंट्स या संघाने ओळखला जाणार आहे. संघाचे मालक संजीव गोयंका यांनी या संबंधीची घोषणा केली. लखनौ संघाने फॅन्सकडून नावांसाठी पर्याय मागितले होते. त्यापैकी लखनौ सुपर जायंट्स हे नाव अंतिम करण्यात आल्याची घोषणा संघाचे मालक संजीव गोयंका यांनी केले. संजीव गोयंका यांनी लखनौ संघाच्या अधिकृत ट्वीटर पेजवरून व्हिडीओ पोस्ट केला आणि संघाच्या नावाची घोषणा केली.
यंदाच्या हंगामापासून लखनौचा संघही स्पर्धेत खेळणार आहेत. अहमदाबाद आणि लखनौ मिळून एकूण १० संघ यंदाच्या IPL मध्ये सहभागी होणार आहेत. मार्चच्या शेवटच्या आठवड्यात ही स्पर्धा सुरू होणार असून मे अखेरपर्यंत ही स्पर्धा रंगणार आहे.
केएल राहुल हा लखनौ संघाचा पहिल्यापासूनच पसंतीचा खेळाडू होता. त्यांनी त्याला करारबद्ध केलं. त्याच्याशिवाय ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू खेळाडू मार्कस स्टॉयनिस आणि फिरकीपटू रवी बिश्नोई यांनाही लखनौ संघाने करारबद्ध केले. मिळालेल्या माहितीनुसार, लखनौ संघाने राहुलला सर्वाधिक १७ कोटींना विकत घेतले. तर मार्कस स्टॉयनिसला ९.२ कोटी आणि रवी बिश्नोईला ४ कोटी रक्कम देत करारबद्ध केलं. याचसोबत आयपीएल मेगा लिलावासाठी (IPL 2022 Mega Auction) लखनौ संघाने ६० कोटींची रक्कम वाचवली.