अयाज मेमन
मोहाली : लखनौ सुपर जायंट्स आणि पंजाब किंग्स या दोन्ही संघांनी प्रत्येकी चार सामने जिंकल्यामुळे कठीण होत असलेल्या ‘प्ले ऑफ’च्या शर्यतीत कायम राहण्यासाठी उभय संघांना शुक्रवारी येथे होणाऱ्या लढतीत विजयाची गरज असेल. येथील खेळपट्टीवर आतापर्यंत २०० धावा निघालेल्या नाहीत, हे विशेष.
लखनौ सुपर जायंट्स कर्णधार लोकेश राहुलच्या स्ट्राईक रेटची चर्चा, मार्क वूडच्या अनुपस्थितीत गोलंदाजी कमकुवत. मागच्या सामन्यात १३६ धावांचा पाठलाग करण्यात अपयश आल्यामुळे फलंदाजीची चिंता वाढली. नवीन उल हक, आयुष बडोनी, आवेश खान, कर्ण शर्मा, युद्धवीर यांच्यावर बळी घेण्याची भिस्त.
पंजाब किंग्स कर्णधार शिखर धवन खेळू शकतो. चुकांमुळे काही सामने गमावले; पण आता जोखीम घेता येणार नाही. प्रभसिमरन, मैथ्यू शॉर्ट, लियाॅम लिव्हिंगस्टोन यांच्याकडून धावा अपेक्षित. सॅम कुरनची कामगिरी लाभदायी. वेगवान अर्शदीप प्रभावी. रबाडा, एलिस यांचाही भेदक मारा उपयुक्त ठरत आहे.