KL Rahul, IPL 2022 SRH vs LSG Live: हैदराबाद विरूद्धच्या सामन्यात लखनौ सुपर जायंट्स संघाने २० षटकात १६९ धावांपर्यंत मजल मारत सनरायजर्स हैदराबाद संघाला १७० धावांचे आव्हान दिले. लखनौच्या डावाची सुरूवात अतिशय खराब झाली होती. पण कर्णधार लोकेश राहुल आणि दीपक हुडा यांच्या ८५ धावांच्या भागीदारीच्या जोरावर लखनौ मोठी धावसंख्या उभारली. राहुल आणि दीपक हुडा दोघांनी अर्धशतके ठोकत संघाला मोठा दिलासा दिला.
संघाच्या डावाची सुरूवात खराब झाली. पण राहुलने मात्र एक बाजू लावून धरली. त्याच्या खेळीच्या जोरावर लखनौला मोठी धावसंख्या करता आली. राहुलने १९व्या षटकापर्यंत झुंज दिली. त्याने ६८ धावांची खेळी केली. त्यात ६ चौकारांचा समावेश होता. याशिवाय त्याने एक षटकारही मारला. राहुलने अर्धशतकी खेळी करत रॉबिन उथप्पाला IPLमध्ये मागे टाकले. राहुलने २७वे अर्धशतक ठोकले. तर उथप्पाच्या नावावर सध्या २६ अर्धशतके आहेत.
लखनौ संघाने प्रथम फलंदाजी करताना पॉवरप्ले मध्ये तीन गडी गमावले. क्विंटन डी कॉक (१) आणि एविन लुईस (१) झटपट बाद झाले. मनिष पांडेही ११ धावांवर माघारी परतला. त्यानंतर मात्र लोकेश राहुल आणि दीपक हुडा जोडीने तडाखेबाज खेळी केल्या. दीपक हुडाने ३३ चेंडूत ३ चौकार आणि ३ षटकारांसह ५१ धावा केल्या. तर राहुलने ५० चेंडूत ६ चौकार आणि एक षटकार लगावत ६८ धावांची खेळी केली.
--
राहुल आणि दीपक हुडा बाद झाल्यानंतर आयुष बडोनीने १२ चेंडूत ३ चौकार लगावत १९ धावा केल्या. त्यामुळे संघाची धावसंख्या १६९ पर्यंत पोहोचली. नटराजन, वॉशिंग्टन सुंदर आणि शेपर्ड या तिघांनी प्रत्येकी २-२ बळी घेतले. भुवनेश्वर कुमारने ४ षटकांत सर्वात कमी (२५) धावा दिल्या. पण त्याला विकेट मिळू शकली नाही.
Web Title: Lucknow Super Giants Captain KL Rahul smashes fifty to overtake CSK Robin Uthappa IPL 2022 SRH vs LSG Live
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.