LSG vs MI, IPL 2023 । लखनौ : आयपीएल २०२३ चा हंगाम अंतिम टप्प्यात येऊन ठेपला आहे. प्लेऑफमध्ये स्थान मिळवण्यासाठी चेन्नई सुपर किंग्ज, लखनौ सुपर जायंट्स, मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात रस्सीखेच सुरू आहे. काल झालेल्या सामन्यात लखनौने मुंबईला पराभवाची धूळ चारून प्लेऑफच्या आशा कायम ठेवल्या आहेत. तर पराभवामुळे मुंबईचे मोठे नुकसान झाल्याचे दिसते. यंदाचा हंगाम काही नाट्यमय घडामोडी अधिक चर्चेत राहिला आहे. याचाच एक भाग म्हणजे लखनौ सुपर जायंट्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात झालेला सामना. या सामन्यात अनेक नाट्यमय घडामोडी घडल्या होत्या.
आरसीबी आणि लखनौ या सामन्यात विराट कोहली आणि नवीन-उल-हक नंतर कोहली आणि गौतम गंभीर यांच्यात बाचाबाची झाल्याचे पाहायला मिळाले होते. विराटसोबत वाद घालणाऱ्या अफगाणी खेळाडूला काल चाहत्यांच्या रोषाला सामोरे जावे लागले. मुंबई इंडियन्स आणि लखनौ यांच्यातील सामन्यादरम्यान क्षेत्ररक्षण करत असलेल्या नवीन-उल-हकला चाहत्यांनी डिवचल्याचे पाहायला मिळाले. त्याच्यासमोर कोहली-कोहली अशा घोषणा देण्यात आल्या. अफगाणिस्तानच्या खेळाडूने देखील हातवारे करत चाहत्यांना उकसवण्याचा प्रयत्न केला. नवीन आणि चाहत्यांमधील या नाट्यमय घडामोडीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
लखनौविरूद्धच्या पराभवानंतर मुंबईचे कोच भडकले; गोलंदाजांवर फोडलं खापर, म्हणाले...
नवीन-उल-हक अन् वाद अफगाणिस्तानचा खेळाडू नवीन-उल-हक त्याच्या तापट स्वभावासाठीही ओळखला जातो. लंका प्रीमियर लीगदरम्यान पाकिस्तानच्या मोहम्मद आमिर आणि शाहिद आफ्रिदीसोबतही त्याचा वाद झाला होता. त्याच्या स्वभावाबद्दल नवीनने एकदा एका कार्यक्रमात म्हटले होते, "जर कोणी माझ्याकडे येऊन काही बोलले तर मी मागे हटणार नाही. मी लहानपणापासून असाच आहे. असा माझा स्वभाव आहे. उद्यापासून मी बदलेन असे म्हणत असेल तर मी खरे बोलत नसेन. मला कोणी काही बोलावे आणि मी माघार घेतो असे मी म्हटले तर ते कधीच होऊ शकत नाही. कारण आक्रमकता माझ्या शरीरात आहे, ती माझ्या डीएनएमध्ये आहे."
मुंबईचा ५ धावांनी पराभवलखनौ सुपर जायंट्सने आपल्या घरच्या मैदानावर मुंबई इंडियन्सला पाच धावांनी पराभूत केले. प्रथम फलंदाजी करताना यजमान लखनौने निर्धारित २० षटकांत ३ गडी गमावून १७७ धावा केल्या. प्रत्युत्तरात मुंबई इंडियन्सचा संघ ५ गडी गमावून केवळ १७२ धावा करू शकला.
क्रिकेटच्या 'दादा'च्या सुरक्षेत मोठी वाढ; पश्चिम बंगाल सरकारनं घेतला निर्णय