Join us  

"पडलो पण हरलो नाही...", मुंबईविरूद्धच्या पराभवानंतर गौतम गंभीरने चाहत्यांचे मानले आभार

  gautam gambhir : ८१ धावांनी मोठा विजय मिळवून मुंबईने फायनलकडे कूच केली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 25, 2023 12:17 PM

Open in App

LSG vs MI : लखनौ सुपर जायंट्सचा दारूण पराभव करून मुंबई इंडियन्सने फायनलच्या दिशेने एक पाऊल टाकले आहे. फायनलमध्ये स्थान मिळवण्यासाठी रोहितसेनेसमोर गतविजेत्या गुजरात टायटन्सचे आव्हान असणार आहे. शुक्रवारी मुंबई आणि गुजरात यांच्यात सामना होणार असून यातील विजयी संघ फायनलमध्ये प्रवेश करेल. काल झालेल्या सामन्यात मुंबईने ऐतिहासिक विजय मिळवत लखनौला बाहेरचा रस्ता दाखवला. आयपीएलच्या इतिहासात प्रथमच मुंबई इंडियन्सने लखनौला पराभूत केले. ८१ धावांनी मोठा विजय मिळवून मुंबईने फायनलकडे कूच केली आहे.

नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना मुंबईने शानदार कामगिरी केली. सांघिक खेळीच्या जोरावर संघाने निर्धारित २० षटकांत ८ गडी गमावून १८२ धावा केल्या. १८३ धावांच्या तगड्या आव्हानाचा पाठलाग करताना लखनौच्या फलंदाजांना घाम फुटला. मुंबईचा आकाश मधवाल लखनौच्या नवाबांसाठी काळ ठरला. त्याने ३.३ षटकांत केवळ ५ धावा देऊन ५ बळी घेतले. लखनौचा संघ २० षटकं देखील खेळू शकला नाही अन् १६.३ षटकांतच १०१ धावांवर सर्वबाद झाला. आपल्या संघाच्या पराभवानंतर संघाचा मेटॉंर गौतम गंभीरने चाहत्यांचे आभार मानताना त्यांना धीर देण्याचा प्रयत्न केला. 

गौतम गंभीरने चाहत्यांचे आभार मानताना म्हटले, "पडलो पण हरलो नाही. अफाट प्रेम दाखवल्याबद्दल चाहत्यांचे खूप खूप आभार." 

मुंबईचा 'आकाश' लखनौसाठी ठरला काळफलंदाजीसाठी कठीण वाटत असलेल्या खेळपट्टीवर मुंबईच्या फलंदाजांनी साजेशी खेळी केली. कॅमेरून ग्रीनने २३ चेंडूत ४१ धावांची सर्वाधिक खेळी केली, तर सूर्यकुमार यादवने (३३) धावा करून सन्मानजनक लक्ष्य उभारण्यात हातभार लावला. १८३ धावांचा बचाव करताना मुंबईने चमकदार कामगिरी केली. युवा आकाश मधवालने सर्वाधिक ५ बळी घेतले, तर ख्रिस जॉर्डन आणि पियुष चावला यांना प्रत्येकी १-१ बळी घेण्यात यश आले.

 

टॅग्स :आयपीएल २०२३लखनौ सुपर जायंट्सगौतम गंभीरमुंबई इंडियन्सरोहित शर्मा
Open in App