IPL 2023, KKR vs LSG Live : लखनौ सुपर जायंट्सचा १ धावेने रोमहर्षक विजय, रिंकू सिंगचे प्रयत्न व्यर्थ

खनौ सुपर जायंट्सला इंडियन प्रीमिअर लीग २०२३ च्या अखेरच्या साखळी सामन्यात विजय मिळवून प्ले ऑफमध्ये जागा पक्की केली. 

By ऑनलाइन लोकमत | Published: May 20, 2023 11:30 PM2023-05-20T23:30:14+5:302023-05-20T23:30:29+5:30

whatsapp join usJoin us
Lucknow Super Giants win by 1 run, QUALIFIED FOR PLAYOFFS; Rinku Singh's effort goes in vain | IPL 2023, KKR vs LSG Live : लखनौ सुपर जायंट्सचा १ धावेने रोमहर्षक विजय, रिंकू सिंगचे प्रयत्न व्यर्थ

IPL 2023, KKR vs LSG Live : लखनौ सुपर जायंट्सचा १ धावेने रोमहर्षक विजय, रिंकू सिंगचे प्रयत्न व्यर्थ

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

IPL 2023, Kolkata Knight Riders vs Lucknow Super Giants Live  Marathi : लखनौ सुपर जायंट्सला इंडियन प्रीमिअर लीग २०२३ च्या अखेरच्या साखळी सामन्यात विजय मिळवून प्ले ऑफमध्ये जागा पक्की केली.  कोलकाता नाइट रायडर्सविरुद्धची ही मॅच जिंकून LSG ला प्ले ऑफमधील स्थान निश्चित करायचे होते आणि त्यांनी ते केले. रिंकू सिंगने पुन्हा एकदा KKRसाठी संकटमोचकाची भूमिका बजावण्याचा प्रयत्न केला, परंतु १ धावांनी KKRला हार मानावी लागली. 


जेसन रॉय आणि वेंकटेश अय्यर यांनी पॉवर प्लेचा पूरेपूर फायदा उचलताना LSG च्या गोलंदाजांवर दडपण निर्माण केले. कृष्णप्पा गौथमने सहाव्या षटकात अय्यरला ( २४) बाद केले आणि ६१ धावांची भागीदारी संपुष्टात आली. कृणाल आणि गौथम यांचे प्रत्येकी ३ षटकं पूर्ण झाल्यानंतर रवी बिश्नोई गोलंदाजीला आला. त्याने पहिल्याच षटकात नितीश राणाला ( ८) बाद करून KKR ला धक्का दिला. पुढच्याच षटकात कृणालने सेट फलंदाज जेसनला ४५ ( २८ चेंडू) धावांवर बाद झाला आणि KKRच्या १० षटकांत ३ बाद ८२ धावा झाल्या. 


इनिंग्जच्या दुसऱ्या हाफमध्ये LSG चे फिरकीपटू सामन्यावर पकड घेण्याच्या प्रयत्नात दिसले. गौथम ( १-२५) आणि कृणाल ( १-३०) यांनी सुरेख गोलंदाजी केली. यश ठाकूर या पार्टीत जॉईन झाला आणि त्याने १४व्या षटकात रहमनुल्लाह गुरबाज ( १०) बाद केले. कोलकाताला ३० चेंडूंत ६३ धावा करायच्या होत्या अन् रिंकू सिंग व आंद्रे रसेल असल्याने त्या सहज शक्य होत्या. रवी बिश्नोईने त्याच्या शेवटच्या षटकात षटकार खाऊनही रसेलला ( ७) त्रिफळाचीत केले.  बिश्नोईने ४-०-२३-२ अशी स्पेल टाकली. २४ चेंडूंत ५६ धावांची गरज असताना रिंकू हाच आशेचा किरण मैदानावर होता. नवीन उल हकने १७व्या षटकात ५ धावा दिल्या. 


यश ठाकूरने टाकलेल्या १८व्या षटकात रिंकूने हात मोकळे केले, परंतु गोलंदाजाने शार्दूल ( ३) झेलबाद करून माघारी पाठवले. सहाव्या चेंडूवर नवीनने सुरेख क्षेत्ररक्षण करून सुनील नरीला ( १) रन आऊट केले. १२ चेंडूंत ४१ धावा KKR हव्या होत्या. रिंकूने १९व्या षटकात ४,४,४,२,६,० अशी फटकेबाजी करून मॅच फिरवली. ६ चेंडूंत २१ धावांची गरज असताना वैभव अरोरा स्ट्राईकवर होता. रिंकूने २८ चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले. अरोराने एक धाव घेत रिंकूला स्ट्राईक दिली. ३ चेंडूंत १८ धावांची गरज असताना रिंकूने षटकार खेचला. कोलकातला ७ बाद १७५ धावांवर समाधान मानावे लागले आणि लखनौने १ धावेने मॅच जिंकली. त्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर दोन धावा न घेण्याचा निर्णय महागात पडला. रिंकू ३३ चेंडूंत ६ चौकार व ४ षटकारांसह ६७ धावांवर नाबाद राहिला. 

 

चेन्नई सुपर किंग्स Play Offs मध्ये; क्वालिफायर १ मध्ये खेळणार का? पाहा गणित

लखनौ सुपर जायंट्ससमोर CSKला मागे टाकण्यासाठी 'कठीण' गणित; महत्त्वाचे समीकरण 

LSG vs KKR च्या निकालापूर्वीच IPLने २ संघांना दिली फायनलसाठी दोन संधी  

तत्पूर्वी, क्विंटन डी कॉक ( २६), करन शर्मा ( ३),  मार्कस स्टॉयनिस ( ०), कर्णधार कृणाल पांड्या ( ९) हे अपयशी ठरले. पण, निकोलस पूरन व आयूष बदोनी LSGसाठी लढले. या जोडीने ४७ चेंडूंत ७४ धावांची भागीदारी केली. बदोनी २५ धावांवर झेलबाद झाला. पूरनने ३० चेंडूंत ४ चौकार व ५ षटकारांसह ५८ धावा केल्या. लखनौने ८ बाद १७६ धावा करून कोलकातासमोर आव्हानात्मक लक्ष ठेवले. KKRच्या वैभव अरोरा, सुनील नरीन आणि शार्दूल ठाकूर यांनी प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या. 
 

Web Title: Lucknow Super Giants win by 1 run, QUALIFIED FOR PLAYOFFS; Rinku Singh's effort goes in vain

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.