नवी दिल्ली : माजी भारतीय अष्टपैलू मदनलाल, वेगवान गोलंदाज आर. पी. सिंग आणि माजी यष्टीरक्षक सुलक्षणा नाईक यांचा शुक्रवारी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) तीन सदस्यांच्या क्रिकेट सल्लागार समितीमध्ये समावेश असल्याची घोषणा करण्यात आली. सीएसीला सध्या वरिष्ठ निवड समितीमध्ये कार्यकाळ पूर्ण करणाऱ्या दोन सदस्यांचे स्थान घेणाºया निवड समिती सदस्यांची निवड करावी लागेल.सीएसीला निवड समितीचे निवर्तमान अध्यक्ष एम. एस. के. प्रसाद (दक्षिण विभाग) आणि गगन खोडा (मध्य विभाग) यांचा पर्याय शोधावा लागणार आहे. बीसीसीआयचे सचिव जय शाह म्हणाले, ‘सीएसीची नियुक्ती वर्षभरासाठी राहील.’ कपिल देव, शांता रंगास्वामी आणि अंशुमन गायकवाड यांचा समावेश असलेल्या सीएसीने हित जोपसण्याचा आरोप झाल्यानंतर पदाचा त्याग केला होता. सीएसी उच्च स्तराची समिती असून त्यांना निर्धारीत नियमांमध्येच काम करायचे आहे. या आव्हानासाठी समितीतील सर्वत अनुभवी मदनलाल सज्ज झाले आहेत. (वृत्तसंस्था)
- Cricket Buzz»
- बातम्या»
- मदनलाल, आर. पी. सिंग यांचा क्रिकेट सल्लागार समितीत समावेश
मदनलाल, आर. पी. सिंग यांचा क्रिकेट सल्लागार समितीत समावेश
सीएसीला निवड समितीचे निवर्तमान अध्यक्ष एम. एस. के. प्रसाद (दक्षिण विभाग) आणि गगन खोडा (मध्य विभाग) यांचा पर्याय शोधावा लागणार आहे.
By ऑनलाइन लोकमत | Published: February 01, 2020 5:27 AM