भारतात क्रिकेटचं किती वेड आहे, हे वेगळं सांगायला नको. त्यामुळेच क्रिकेटचा कोणताही सामना हा एखाद्या सणाप्रमाणे साजरा केला जातो. पण, याच क्रिकेटच्या वेडापाईन अनेक विपरित घटनाही घडल्याचा इतिहास आहे. अशीच एक घटना मध्यप्रदेशच्या ग्वालियर येथे घडली. फलंदाजाचा झेल पकडणं एका फिल्डरचा महागात पडले. ग्वालियर येथे आयोजित एका सामन्यात २३ वर्षीय फलंदाज ४९ धावांवर झेलबाद झाला आणि ज्या फिल्डरने त्याचा झेल पकडला त्याला त्यानं बॅटनं मारलं. यानंतर त्या फलंदाजावर FIR दाखल झाला आहे.
पोलिस अधीक्षक रामनरेश पचौरी यांनी सांगितले की, सचिन पराशन ( २३ वर्ष) नावाच्या खेळाडूला गंभीर अवस्थेत येथील सरकारी हॉस्पिटलमध्ये आणण्यात आले. संजय पालिया या खेळाडूला हत्येच्या प्रयत्न केल्याप्रकरणी दोषी ठरवण्यात आले आहे. शनिवारी ही घटना घडली. संजय हा सध्या फरार आहे. Fakhar Zaman : फखर जमानवर झाला अन्याय; भारतीय चाहते विसरले पाकिस्तानसोबतचे वैर अन्...
पचौरी यांनी सांगितले की,''संजय ४९ धावांवर असताना सचिननं त्याचा झेल घेतला आणि अर्धशतक हुकल्याचा संजयला राग आला. त्यानंतर त्यानं सचिनला बॅटिनं बेदम मारले. अन्य खेळाडूंनी त्याला रोखण्याचा प्रयत्न केला, परंतु सचिन गंभीर जखली झाला होता. बेशुद्धावस्थेत त्याला हॉस्पिटलमध्ये आणले होते.Fakhar Zaman Run Out : क्विंटन डी कॉकनं पाकिस्तानी फलंदाजाचा 'पोपट' केला, मोठा वादच निर्माण झाला; Videoपत्रिका.कॉमच्या माहितीनुसार शनिवारी दुपारी १२ वाजता ही घटना घडली. २४ तासानंतर सचिन शुद्धीवर आला. त्यानंतर FIR नोंदवण्यात आली आहे आणि संजयचा शोध सुरू आहे.