Join us  

१४८ संघ, २३०० खेळाडू! भारताच्या या भागात रंगला 'क्रिकेट कुंभमेळा'; विजेत्याला संघाला किती रक्कम?

५ ते २९ सप्टेंबर, तब्बल २४ दिवस खेळली गेली स्पर्धा

By ऑनलाइन लोकमत | Published: October 02, 2023 4:19 PM

Open in App

Cricket Mahakumbh: काही दिवसांतच भारतात क्रिकेटचा कुंभमेळा म्हणजेच आयसीसी विश्वचषक सुरू होणार आहे. याबाबत क्रिकेटप्रेमी आणि तरुणांमध्ये प्रचंड उत्साह आहे. देशातील अनेक शहरांमध्ये सामने होणार आहेत. त्यासाठी जय्यत तयारी करण्यात आली आहे. क्रिकेटचा हा कुंभमेळा सुरू होण्यापूर्वी मध्यप्रदेशच्या शहडोलमध्ये क्रिकेटचा महाकुंभ पाहायला मिळाला. जिल्ह्यातील बेओहरी येथे विश्वचषकापूर्वी 'क्रिकेट महाकुंभ'चे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये परिसरातील तब्बल 148 संघांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला.

क्रिकेट महाकुंभात 148 गावांतील संघ सहभागी झाले होते. या कार्यक्रमाचे आयोजन स्थानिक आमदार शरद जगलाल कोळ यांनी केले होते. ग्रामीण भागातील कलागुणांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी क्रिकेट सामन्यांचे आयोजन करण्यात आले. ही स्पर्धा 5 सप्टेंबरपासून सुरू होऊन 29 सप्टेंबरपर्यंत चालली. त्यात 148 संघांनी सहभाग घेतला आणि दोन हजारांहून अधिक युवा खेळाडूंनी यात सहभाग घेतला.

2300 क्रिकेटपटू, विजेत्याला संघाला किती रक्कम?

ग्रामीण भागातील टॅलेंट क्रिकेटच्या माध्यमातून लोकांपर्यंत आणण्याचा प्रयत्न स्थानिक आमदारामार्फत करण्यात आला. त्यात संपूर्ण विधानसभेतील 2300 युवा क्रिकेटपटूंनी क्रिकेट महाकुंभात सहभाग घेतला. हा क्रिकेट महाकुंभ बेओहारी येथील स्टेडियममध्ये खेळवण्यात आला. 24 दिवस चाललेला क्रिकेट महाकुंभ 29 सप्टेंबर रोजी संपला. त्यात कुमिया आणि आमझोर यांच्यात अंतिम सामना झाला. फायनलमध्ये आमझोरच्या संघाने विजय मिळवला. विजेत्यााला एक लाख एक हजाराचे बक्षीस मिळाले तर उपविजेत्याला ५१ हजार रुपयाचे बक्षीस देण्यात आले.

टॅग्स :मध्य प्रदेश