Corona Virus ने जगभरात थैमान माजवले आहे. कोरोना विषाणुंमुळे जगभरात आत्तापर्यंत ४६३२ लोकांचा मृत्यू झाला आहे. भारतात कोरोना व्हायरने बाधित असलेल्या संशयितांची संख्या जबळपास ६८ पर्यंत गेली आहे. त्यामुळे इंडियन प्रीमिअर लीग ( आयपीएल 2020) खेळवायची की नाही, यावर चर्चा सुरू आहे. पण, ही स्पर्धाच रद्द करण्यात यावी, यासाठी मद्रास उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात आली होती. त्यात केंद्र सरकारनं बीसीसीआयला आयपीएलचे सामने खेळवण्याची परवानगी देऊ नये, अशी मागणी करण्यात आली आहे. त्यावर आज मद्रास उच्च न्यायलायात सुनावणी झाली आणि बीसीसीआयला त्यांची भूमिका मांडण्यासाठी डेडलाईन देण्यात आली आहे.
वकील जी अॅलेक्स बेंझीगर यांनी ही याचिका दाखल केली होती. त्यावर आज न्यायाधीश एमएम सुरेंद्र आणि कृष्णन रामास्वामी यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. ''जागतिक आरोग्य संघटनेच्या ( WHO)च्या वेबसाईटवरील माहितीनुसार अजूनपर्यंत कोरोना विषाणू रोखण्यासाठी कोणत्याही प्रकारच्या औषधाचा शोध लागलेला नाही,'' असे याचिकाकर्त्यांनी सांगितले आहे. कोरोना विषाणूचा प्रसार झपाट्यानं होत असल्याचे याचिकाकर्त्याचे म्हणणे आहे.
न्यायाधीश एमएम सुरेंद्र आणि कृष्णन रामास्वामी यांच्या खंडपीठाने बीसीसीआयला २३ मार्चपर्यंत त्यांची भूमिका न्यायालयासमोर मांडण्यास सांगितली आहे. तसेच त्यांनी केंद्रीया आरोग्य मंत्रालयालाची त्यांची भूमिका काय, हे विचारले आहे.
दरम्यान, इंडियन प्रीमिअर लीग ( आयपीएल 2020) आणि देशात होणाऱ्या अन्य महत्त्वांच्या स्पर्धांबाबत केंद्रीय क्रीडा मंत्रालयानं गुरुवारी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर क्रीडा मंत्रालयाने भारतीय क्रिकेट नियामक मंडळासह ( बीसीसीआय) देशातील सर्व राष्ट्रीय क्रीडा संघटनांना सूचना केल्या आहेत. त्यानुसार कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी स्पर्धा घेताना त्या बंद स्टेडिमयवर म्हणजेच प्रेक्षकांविनाच घ्या असे आदेश क्रीडा मंत्रालयाने दिले आहेत.
IANS या वृत्तसंस्थेशी बोलताना केंद्रीय क्रीडा सचिव राधेश्याम जुलानिया यांनी सांगितले की,''जर एखादी स्पर्धा प्रेक्षकांविना खेळवता येत असेल तरच त्याचे आयोजन करा. तेथे अधिकाधिक लोकं जमणार नाही याची काळजी घ्या.'' बीसीसीआय योग्य ती काळजी घेईल, असे बीसीसीआयच्या अधिकाऱ्यानं IANSला सांगितले. ते म्हणाले,''खेळाच्या, खेळाडूंच्या, चाहत्यांच्या आणि लीगच्या दृष्टीनं योग्य तो निर्णय घेतला जाईल. सध्याच्या परिस्थितीवर बीसीसीआयचे नियंत्रण नाही.''
अन्य महत्त्वाच्या बातम्या
IPL 2020चं भवितव्य अधांतरी; शनिवारी बोलावली तातडीची बैठक
Coronavirus: केंद्र सरकारच्या 'त्या' एका निर्णयाने IPL 2020 मोठा फटका
मोठा निर्णय, सचिन-वीरूची फलंदाजी प्रत्यक्ष पाहता येणार नाही!
शारजात पुन्हा टीम इंडियाचं वादळ घोंगावलं, कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानला लोळवलं
OMG : आंतरराष्ट्रीय खेळाडूला Corona Virusची लागण, संपूर्ण लीग करावी लागली रद्द