बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंग (Ranveer Singh) याचा बहुप्रतिक्षीत ठरलेला '83' हा चित्रपट अलिकडेच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. १९८३ मध्ये भारताने लॉर्ड्सच्या मैदानावर वेस्ट इंडिजचा पराभव करून प्रथमच क्रिकेट विश्वचषक जिंकला होता. याच विजयगाथेवर '83' हा चित्रपट आधारित आहे. या चित्रपटामध्ये रणवीरने तत्कालीन कर्णधार कपिल देव (kapil dev) यांची भूमिका साकारली आहे. पहिल्या दिवसापासून सुपरहिट ठरलेल्या या चित्रपटावर सर्व स्तरांमधून कौतुकाचा वर्षाव होत आहे.
भारतीय कसोटी संघाचा कर्णधार विराट कोहली आणि बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा यांनी देखील आता ट्विटरद्वारे या चित्रपटाचे कौतुक केले आहे. विरोट कोहली म्हणाला की, भारतीय क्रिकेट इतिहासातील सर्वात प्रतिष्ठित क्षण यापेक्षा चांगले चित्रित करता येणार नाहीत. एक काल्पनिकरित्या बनवलेला चित्रपट, जो तुम्हाला 1983 च्या विश्वचषकातील घटना आणि भावनांमध्ये विसर्जित करतो, सर्वांची उत्कृष्ट कामगिरी. 1983 च्या विश्वचषकाच्या विजयावर आधारित घटना चित्रपटात योग्यरित्या दाखविण्यात आल्या आहेत, असं विरोट कोहलीने म्हटलं आहे. तसेच रणवीस सिंग याचं कौतुक देखील विरोटने केलं आहे.
तसेच अनुष्ता शर्मा म्हणाली की, '83' सिनेमा भारताच्या क्रीडा इतिहासातील एक जादुई क्षण आहे. नवीन पिढीला या चित्रपटाच्या माध्यमातून अनेक गोष्टी शिकायला मिळणार आहेत.
कलाविश्वातून होतोय कौतुकाचा वर्षाव-
'83' या चित्रपटाला सामान्यांपासून सेलिब्रिटींपर्यंत अनेकांचं प्रेम मिळत आहे. कलाविश्वातील अनेक दिग्गज कलाकारांनी या चित्रपटाचं आणि त्यातील कलाकारांचं कौतुक केलं आहे. यात ऋचा चड्ढा, सुनील शेट्टी, रिया चक्रवर्ती अशा अनेक कलाकारांनी या चित्रपटाचं कौतुक केलं आहे.
रणवीर व्यतिरिक्त 'हे' कलाकार झळकले मुख्य भूमिकेत-
या चित्रपटात कपिल देव यांची भूमिका रणवीर सिंगने साकारली आहे. तर,सुनील गावसकरांच्या भूमिकेत ताहिर राज भसीन, यशपाल शर्मांच्या भूमिकेत जतीन सरना, मोहिंदर अमरनाथ यांच्या भूमिकेत साकिब सलीम, रवी शास्त्रींच्या भूमिकेत धैर्य करवा, के. श्रीकांत यांच्या भूमिकेत जिवा, मदन लाल यांच्या भूमिकेत हार्डी संधू, बलविंदर सिंग यांच्या भूमिकेत एमी. विर्क, सय्यद किरमानी यांच्या भूमिकेत साहिल खट्टर, संदीप पाटील यांच्या भूमिकेत चिराग पाटील, दिलीप वेंगसरकर यांच्या भूमिकेत आदिनाथ कोठारे, कीर्ती आझाद यांच्या भूमिकेत दिनकर शर्मा, रॉजर बिन्नींच्या भूमिकेत निशांत दहिया हे कलाकार झळकले आहेत. तसंच पंकज त्रिपाठी यांनी टीम मॅनेजर पीआर मान सिंग यांची भूमिका वठवली आहे.
Web Title: Magical moments in sports history; Virat Kohli And Anushka Sharma reaction after watching '83' movie
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.