Join us  

एक दोन नाही तब्बल ३ सुपर ओव्हर! क्रिकेटच्या इतिहासात असं पहिल्यांदाच घडलं; तेही भारतीय मैदानात

क्रिकेटच्या मैदानातील सर्वात रंगतदार सामना; तीन सुपर ओव्हरनंतर ठरला विजेता

By ऑनलाइन लोकमत | Published: August 24, 2024 9:50 AM

Open in App

क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ आहे. कोणत्या सामन्यात कधी ट्विस्ट येईल काही सांगता येत नाही. टी-२० क्रिकेटच्या जमान्यात या खेळातील रंगत आणखी वाढलीये. अनेकदा सामना टाय झाल्याचेही पाहायला मिळते. टी-२० मध्ये सामना बरोबरीत सुटल्यावर सुपर ओव्हरचा थरार पाहायला मिळतो. पण एकाच सामन्यात किती सुपर ओव्हर पाहायला मिळतील, याचाही काही नेम नाही. हीच गोष्ट आता पाहायला मिळाली आहे. क्रिकेटच्या सामन्याचा निकाल लावण्यासाठी तब्बल तीन सुपर ओव्हरचा खेळ पाहायला मिळाला. ज्याची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगताना दिसत आहे. 

आतापर्यंत कधीच पाहायला मिळालं तो सीन दाखवणारा सुपर ओव्हरचा थरार 

फुटबॉलच्या मैदानात सामना बरोबरीत सुटल्यावर  निकाल लागत नाही तोपर्यंत पेनल्टीशूट आउट कायम राहते. हाच नियम सुपर ओव्हरच्या बाबतीतही लागू होतो. महाराजा करंडक स्पर्धेतील एका सामन्यात याच नियमामुळे थरारक सामना पाहायला मिळाले.  बंगळुरू ब्लास्टर्स आणि हुबळी टायगर्सच्या यांच्यात रंगलेल्या महाराजा करंडक स्पर्धेतील सामन्यात नवा इतिहास रचला गेला. जे आतापर्यंत कधीच पाहायला मिळालं नाही तो सीन क्रिकेट चाहत्यांनी अनुभवला. कारण या सामन्याचा निकाल  तीन सुपर ओव्हर्सनंतर लागला. 

मनिष पांडे विरुद्ध मयंक अग्रवाल

भारतीय संघाच्या दोन स्टार्सच्या नेतृत्वाखालील रंगलेल्या सामन्यात सुपर ओव्हरचा कमालीचा योगायोग पाहायला मिळाला.  या रंगतदार सामन्यात मनीष पांडेच्या नेतृत्वाखालील हुबळी टायगर्स संघाने मयंक अग्रवालच्या नेतृत्वाखालील बंगळुरु संघाविरुद्ध फायनली विजय मिळवला.  

अन् सामना बरोबरीत सुटला

या सामन्यात टायगर्स संघाने पहिल्यांदा बॅटिंग करताना १६४ धावा केल्या होत्या. ब्लास्टर्सनं निर्धारित २० षटकात तेवढ्याच धावा केल्या. त्यामुळे हा सामना सुपर ओव्हरमध्ये गेला.  टायगर्सकडून मनिष पांडेने सर्वाधिक ३३ धावा केल्या. दुसरीकडे ब्लास्टर्सचा कर्णधार मयंकने ५४ धावांची खेळी केली. ब्लास्टर्सकडून लविश कौशलने ५ विकेट्स घेतल्या आणि टायगर्सकडून मानवंथ कुमार एल याच्या खात्यात ४ विकेट्स जमा झाल्याचे पाहायला मिळाले. 

सुपर ओव्हर्सची रंगत

  • पहिल्या सुपर ओव्हरमध्ये, ब्लास्टर्सने एका विकेटच्या मोबदल्यात १० धावा केल्या.
  •  
  • त्यानंतर मैदानात उतरलेल्या टायगर्स संघाने कोणतीही विकेट न गमावता १० धावा काढल्या. परिणामी सामना दुसऱ्या सुपर ओव्हरमध्ये गेला. 
  •  
  • हुबळीच्या संघाने दुसऱ्या सुपर ओव्हरमध्ये ९ धावांचे टार्गेट सेट केले होते. यावेळीही  बंगळुरुच्या संघाने ८ धावा केल्या.  .
  •  
  • तिसऱ्या सुपर ओव्हरमध्ये ब्लास्टर्सने १३ धावांचे लक्ष्य ठेवले होते.
  • यावेळी मात्र टायगर्सने यशस्वीपणे हे टार्गेट गाठत सामना खिशात घातला. क्रांती कुमारच्या दोन खणखणीत चौकारामुळे संघाने सुपर विजयाची नोंद केली. 
टॅग्स :टी-20 क्रिकेटभारतीय क्रिकेट संघभारतीय क्रिकेट संघ