कोलंबो - फिरकी गोलंदाज केशव महाराज याने कसोटी क्रिकेटमध्ये दक्षिण आफ्रिकेसाठी 1957 नंतरची सर्वोत्तम कामगिरी करण्याचा पराक्रम केला. त्याने श्रीलंकेविरूद्धच्या दुस-या कसोटी सामन्यात 129 चेंडूंत 9 विकेट्स घेतल्या. अथक प्रयत्नानंतर त्याला अखेरची विकेट मिळवण्यात यश प्राप्त झाले. रंगना हेरथ आणि अकिला धनंजया यांनी 10व्या विकेटसाठी केलेल्या 74 धावांची भागिदारी त्याने संपुष्टात आणली. दक्षिण आफ्रिकेसाठी एका डावात 9 विकेट्स घेणारा तो दुसरा गोलंदाज ठरला. द. आफ्रिकेच्या गोलंदाजांची कसोटीतील सर्वोत्तम कामगिरीह्यूज टेयफिल्ड - 9/113 वि. इंग्लंड, जोहान्सबर्ग 1957केशव महाराज - 9/129 वि. श्रीलंका, कोलंबो 2018गॉडफ्रे लॉरेन्स - 8/53 वि. न्यूझीलंड, जोहान्सबर्ग 1961लान्स क्युजनर - 8/64 वि. भारत, कोलकाता 1996ह्यूज टेयफिल्ड - 8/69 वि. इंग्लंड, डर्बन 1957टिप स्नूक - 8/70 वि. इंग्लंड, जोहान्सबर्ग 1906अॅलन डोनाल्ड - 8/71 वि. झिम्बाब्वे, हरारे 1995
- Cricket Buzz»
- बातम्या»
- महाराजचा पराक्रम, 61 वर्षांनंतर द. आफ्रिकेचा गोलंदाजाने केला विक्रम
महाराजचा पराक्रम, 61 वर्षांनंतर द. आफ्रिकेचा गोलंदाजाने केला विक्रम
फिरकी गोलंदाज केशव महाराज याने कसोटी क्रिकेटमध्ये दक्षिण आफ्रिकेसाठी 1957 नंतरची सर्वोत्तम कामगिरी करण्याचा पराक्रम केला.
By ऑनलाइन लोकमत | Published: July 21, 2018 4:18 PM