Join us

Maharashtra day : 'तो' खास फोटो अन् सचिन तेंडुलकरने दिल्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा

कोरोना व्हायरसचा प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर यंदा महाराष्ट्र दिन साधेपणानेच साजरा होत आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 1, 2020 12:01 IST

Open in App

कोरोना व्हायरसचा प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर यंदा महाराष्ट्र दिन साधेपणानेच साजरा होत आहे. संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी आपले प्राण अर्पण करणाऱ्या हुतात्म्यांना महाराष्ट्र राज्याच्या 60 व्या वर्धापन दिनानिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज हुतात्मा चौक येथील त्यांच्या स्मारकास पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सोशल डिस्टन्स पाळत महाराष्ट्रासाठी हौतात्म्य पत्करणाऱ्यांना अभिवादन करुन, महाराष्ट्र दिन साजरा करण्यात आला. महान फलंदाज सचिन तेंडुलकरनंही एक खास फोटो पोस्ट करून सर्वांना महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा दिल्या. टीम इंडियाचा उपकर्णधार अजिंक्य रहाणे यानेही मराठीतून महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

''आपणा सर्वांना महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. आनंदी रहा, घरी रहा आणि सुरक्षित रहा!,'' असे रहाणेनं ट्विट केलं. सचिन तेंडुलकरनंही पोस्ट केलं की,''आपल्या सर्वांना महाराष्ट्र दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा! जय महाराष्ट्र!''  

Sania Mirza ला मिळाली आनंदाची बातमी; म्हणाली, हा क्षण माझ्यासाठी खास! 

Bad News : टोक्यो ऑलिम्पिक स्पर्धेनंतर क्रिकेटची मोठी लीग 2020मध्ये होणार नाही

टॅग्स :महाराष्ट्र दिनसचिन तेंडुलकरअजिंक्य रहाणे