Maharashtra Premier League news : १५ जूनपासून महाराष्ट्रातील क्रिकेटचा एक नवा अध्याय सुरू होत आहे. महाराष्ट्रातील क्रिकेटपटूंना नवं व्यासपीठ मिळावं यासाठी महाराष्ट्र प्रीमिअर लीगची स्पर्धा सुरू होत आहे. IPL च्या धर्तीवर महाराष्ट्र प्रीमिअर लीगचे (maharashtra premier league 2023) आयोजन करण्यात आले आहे. या लीगमुळे महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील खेळाडूंना स्वत:ला सिद्ध करण्याचं नवं व्यासपीठ मिळणार आहे. यामध्ये भारतासाठी आंतरराष्ट्रीय पातळीवर खेळलेले खेळाडू केदार जाधव, राहुल त्रिपाठी आणि ऋतुराज गायकवाड यांचाही सहभाग असणार आहे. १५ ते २९ जून या कालावधीत ही स्पर्धा खेळवली जाईल. पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियममध्ये हा थरार रंगेल.
आगामी स्पर्धेसाठी लिलाव प्रक्रिया पार पडली ज्यात कोल्हापूरच्या शिलेदाराने सर्वाधिक भाव खाल्ला. कोल्हापूर टस्कर्सने नौशादला शेखवर सर्वाधिक सहा लाख रुपयांची बोली लावली. नौशाद शेखवर सर्वाधिक बोली लागली आणि सहा लाख रूपयांमध्ये कोल्हापूरच्या संघाने त्याला आपल्या ताफ्यात घेतले. त्यापाठोपाठ दिव्यांग दिव्यांग हिंगणेकरला रत्नागिरी जेटसने ४ लाख ६० हजार रूपयांत आपल्या संघात घेतले. तसेच रत्नागिरीच्या संघाने साहिल औताडे (३ लाख ८० हजार), अंकित बावणे (२ लाख ८० हजार) यांना देखील आपल्या संघात घेतले.
महाराष्ट्र प्रीमिअर लीगचे आयकॉन खेळाडू -
- पुणेरी बाप्पा - ऋतुराज गायकवाड
- कोल्हापूर टस्कर्स - केदार जाधव
- ईगल नाशिक टायटन्स - राहुल त्रिपाठी
- छत्रपती संभाजी किंग्ज- राजवर्धन हंगरगेकर
- रत्नागिरी जेट्स- अझीम काजी
- सोलापूर रॉयल्स - विकी ओस्तवाल
सोलापूर रॉयल्सचा संघ -
- विकी ओस्तवाल (आयकॉन खेळाडू)
- सत्यजित बच्छाव ( रुपये ३.६० लाख)
- ओमकार राजपूत ( रुपये २० हजार)
- हर्षवर्धन टिंगरे ( रुपये २० हजार)
- सुनील यादव ( रुपये १ लाख)
- यश बोरकर ( रुपये ८० हजार)
- प्रथमेश गावडे ( रुपये ६० हजार)
- प्रणय सिंग ( रुपये ७० हजार)
- अंश धूत ( रुपये २० हजार)
- प्रतीक म्हात्रे ( रुपये २० हजार)
- संकेत फराटे ( रुपये ८० हजार)
- प्रवीण देशेट्टी ( रुपये २ लाख)
- अथर्व काळे ( रुपये १.४० लाख)
- यश नहार ( रुपये ३.८० लाख)
- मेहुल पटेल ( रुपये ४० हजार)
- यासर शेख ( रुपये ४० हजार)
- देव दी नाटू ( रुपये २० हजार)
- अभिनव भट ( रुपये २० हजार)
- स्वप्निल फुलपगार ( रुपये ८० हजार)
- विशांत मोरे ( रुपये ६० हजार)
- ऋषभ राठोड ( रुपये १.८० लाख)
ईगल नाशिक टायटन्सचा संघ -
- राहुल त्रिपाठी ( आयकॉन खेळाडू)
- सिद्धेश वीर ( रुपये २.६० लाख)
- आशय पालकर ( रुपये २.४० लाख)
- धनराज शिंदे ( रुपये ३० हजार)
- आदित्य राजहंस ( रुपये २० हजार)
- अर्शिन कुलकर्णी ( रुपये १.४० लाख )
- इझान सय्यद ( रुपये ७० हजार)
- रेहान खान ( रुपये २० हजार)
- रिषभ करवा ( रुपये ६० हजार)
- रझाक फल्ला ( रुपये ४० हजार)
- ओमकार आखाडे ( रुपये ४० हजार)
- अक्षय वालकर ( रुपये ४० हजार)
- प्रशांत सोळंकी ( रुपये २.४० लाख)
- सिद्धांत दोशी ( रुपये ४० हजार)
- साहिल पारीख ( रुपये ६० हजार)
- वैभव विभुते ( रुपये २० हजार)
- कौशल तांबे ( रुपये २.४० लाख)
- हर्षद खडीवाले ( रुपये १.२० लाख)
- रोहित हाडके ( रुपये २० हजार)
- मंदार भंडारी ( रुपये १.८० लाख)
- शुभम नागवडे ( रुपये ४० हजार)
- शार्विन किस्वे ( रुपये ४० हजार)
- वरुण देशपांडे ( रुपये ४० हजार)
पुणेरी बाप्पा संघ -
- ऋतुराज गायकवाड ( आयकॉन खेळाडू)
- ऋषिकेश शुंभे (रुपये २० हजार )
- रोहन दामले (रुपये २ लाख)
- प्रशांत कोरे ( रुपये ४० हजार)
- अद्वेय शिधये (रुपये ४० हजार)
- अझहर अन्सारी (रुपये १ लाख)
- शुभंकर हर्डीकर (रुपये २० हजार)
- वैभव चौगुले (रुपये १.६० लाख)
- रोशन वाघसरे (रुपये १.१० लाख)
- पियुष साळवी (रुपये १.४० लाख)
- आदित्य धवरे ( रुपये ५० हजार)
- सौरभ दिघे (रुपये २० हजार)
- शुभम कोठारी (रुपये ४० हजार)
- सोहम जमले (रुपये ८० हजार)
- सईश दिघे (रुपये २० हजार)
- सचिन भोसले (रुपये ४० हजार)
- अभिमन्यू जाधव (रुपये २० हजार)
- यश क्षीरसागर (रुपये १.४० लाख)
- पवन शहा ( रुपये २.२० लाख)
- श्रीपाद निंबाळकर (रुपये ४० हजार)
- हर्ष सांगवी (रुपये ८० हजार)
- दिग्विजय पाटील (रुपये ८० हजार)
- अजय बोरुडे (रुपये २० हजार)
- आदर्श बोटरा (रुपये २० हजार)
- भूषण नवांडे (रुपये २० हजार)
- कुश दीक्षित (रुपये २० हजार)
- हर्ष ओसवाल (रुपये २० हजार)
- सुरज शिंदे (रुपये २.४० लाख)
कोल्हापूर टस्कर्सचा संघ -
- केदार जाधव ( आयकॉन खेळाडू)
- नौशाद शेख ( रुपये ६ लाख)
- कीर्तीराज वाडेकर ( रुपये २० हजार)
- मनोज यादव ( रुपये ६० हजार)
- विद्या तिवारी (रुपये ६० हजार)
- अत्मन पोरे ( रुपये २० हजार)
- अक्षय दरेकर ( रुपये ८० हजार)
- श्रेयंश चव्हाण ( रुपये ९० हजार)
- सिद्धार्थ म्हात्रे ( रुपये ३० हजार)
- तरणजीत धिल्लोन ( रुपये १.६० लाख)
- निहाल तुस्माड ( रुपये २० हजार)
- रवी चौधरी ( रुपये २० हजार)
- अंकित बावणे ( रुपये २.८० लाख)
- सचिन धस ( रुपये १.५० लाख)
- निखिल मदस ( रुपये २० हजार)
- साहिल औताडे ( रुपये ३.८० लाख)
छत्रपती संभाजी किंग्ज संघ -
- राजवर्धन हांगर्गेकर ( आयकॉन खेळाडू)
- रामेश्वर दौंड (रुपये २० हजार)
- आकाश जाधव (रुपये २० हजार)
- मोहसीन सय्यद (रुपये ८० हजार)
- जगदीश झोपे (रुपये १ लाख)
- हितेश वाळुंज (रुपये २.२० लाख)
- ऋषिकेश नायर (रुपये २० हजार)
- स्वराज चव्हाण (रुपये २० हजार)
- ओम भोसले (रुपये ८० हजार)
- शम्स काझी (रुपये २.८० लाख)
- आनंद ठेंगे (रुपये १.१० लाख)
- मूर्तजा ट्रंकवाला (रुपये १.८० लाख)
- रणजीत निकम (रुपये २.२० लाख)
- अंकित नलावडे (रुपये ४० हजार)
- स्वप्निल चव्हाण (रुपये ४० हजार)
- हर्षल काटे (रुपये १ लाख)
- ओंकार खापटे (रुपये ४० हजार)
- ऋषिकेश दौंड (रुपये ४० हजार)
- अश्विन भापकर (रुपये २० हजार)
- तनेष जैन (रुपये ५० हजार)
- वरुण गुज्जर (रुपये २० हजार)
- सौरभ नवले (रुपये २.६० लाख)
- अभिषेक पवार (रुपये ४० हजार)