Join us

Ruturaj Gaikwad Century : ऋतुराज गायकवाडचे सलग तिसरे शतक; मागील १० डावांत १८०.४२च्या सरासरीने कुटल्यात १२६३ धावा, Video

Ruturaj Gaikwad Century : महाराष्ट्र संघाचा कर्णधार ऋतुराज गायकवाड याचा फॉर्म दमदार सुरू आहे. विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेतील अंतिम सामन्यात सौराष्ट्र संघाविरुद्ध शतक झळकावले

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 2, 2022 13:05 IST

Open in App

Ruturaj Gaikwad Century : महाराष्ट्र संघाचा कर्णधार ऋतुराज गायकवाड याचा फॉर्म दमदार सुरू आहे. विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेतील अंतिम सामन्यात सौराष्ट्र संघाविरुद्ध शतक झळकावले. ऋतुराजचे हे सलग तिसरे शतक ठरले. सलामीला फलंदाजीला आलेल्या ऋतुराजने १३१ चेंडूत १०८ धावांची खेळी केली. त्याच्या या खेळीत ७ चौकार आणि ४ षटकार खेचले.  त्याने ही खेळी करताना सत्यजीत बचावबरोबर दुसऱ्या विकेटसाठी ६६ धावांची आणि अझिम काझीबरोबर चौथ्या विकेटसाठी ९४ धावांची भागीदारी केली. ४२ व्या षटकात प्रेरक मंकडने त्याला धावबाद केले. ऋतुराजच्या शतकानंतरही महाराष्ट्राने ८ बाद २४८ धावा केल्या. 

ऋतुराज गायकवाडची विजय हजारे ट्रॉफीतील मागील १० डावांमधील खेळी... त्याने १८०.४२च्या सरासरीने १२६३ धावा केल्या आणि त्यात ८ शतकांचा समावेश होता.  136 (112).154* (143).124 (129).21 (18).168 (132).124* (123).40 (42).220* (149).168 (126).108 (131).

कार्तिकने केला कौतुकाचा वर्षावदिनेश कार्तिकने ट्विट करून एक मोठे विधान केले आहे. "देवा, हा माणूस देशांतर्गत क्रिकेट खूप सोपे बनवत आहे, काय खेळाडू आहे. @Ruutu1331 सर्व नॉकआउट गेममध्ये तू शानदार खेळी केलीस. लवकरच पुन्हा आंतराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आगमन होईल", अशा आशयाचे ट्विट करून कार्तिकने सूचक विधान केले आहे. 

 

 

टॅग्स :ऋतुराज गायकवाडविजय हजारे करंडक
Open in App